
गायकवाड यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडेही धाव घेत झालेला प्रकार कथन केला होता. त्यानंतर आता टरबूज खरेदीदार व्यापारी सुरेंद्र सूर्यवंशीविरोधात तालुका पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
येवला (नाशिक) : टरबूज खरेदीनंतर शेतकऱ्याचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अशी घडली घटना
तालुक्यातील धुळगाव येथील शेतकरी प्रशांत वाल्मीक गायकवाड या शेतकऱ्याकडून येवला येथील व्यापारी सुरेंद्र बाबूराव सूर्यवंशी याने यंदा ८ व ९ मेस टरबूज खरेदी केले होते. १२ टन वजनाचे एकूण ७८ हजार रुपयांचे टरबूज खरेदी करताना ही रक्कम या व्यापाऱ्याने थकवून ती देण्यास टाळाटाळ केली. सातत्याने मागणी करूनही रक्कम न मिळाल्याने शेतकरी प्रशांत गायकवाड यांनी येवला तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती.
हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा
बरोबरच गायकवाड यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडेही धाव घेत झालेला प्रकार कथन केला होता. त्यानंतर आता टरबूज खरेदीदार व्यापारी सुरेंद्र सूर्यवंशीविरोधात तालुका पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा