संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने टाकळीरोड येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद बुलेट आली असता पोलिसांनी ती अडविली. या बुलेटची तपासणी केली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळल्या. 

नाशिक : मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने टाकळीरोड येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद बुलेट आली असता पोलिसांनी ती अडविली. या बुलेटची तपासणी केली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळल्या. 

बुलेटची तपासणी करताच पोलिसांना आढळल्या धक्कादायक गोष्टी

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार लुटमारीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सर्वच गुन्हे शाखांना विनापरवाना शस्त्रे घेऊन मिरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यासाठी मोहीम हाती घेण्याची सूचना केली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेतील हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने, धर्मराज बांगर यांच्या पथकाने टाकळीरोड येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद बुलेट (एमएच १५ एफझेड २३२८) आली असता पोलिसांनी ती अडविली. या बुलेटची तपासणी केली असता पोलिसांना मागील बाजूस सीटच्या उजव्या बाजूने एका बॅनरमध्ये दोन धारधार तलवारी गुंडाळून बांधण्यात आल्याचे आढळले.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा 

आदेशाचे उल्लंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखांचे गस्तीपथके सक्रिय झाली आहेत.पोलिसांनी या प्रकारा विरुद्ध पोलीस आयुक्तालय हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगणे आदेशाचे उल्लंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swords found under seat bullet nashik crime marathi news