सरकारी कामात अडथळा आणणं आले अंगाशी; अखेर 'त्या' महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

विनोद बेदरकर
Friday, 15 January 2021

शांततेचा भंग केला म्हणून दोघांना ताब्यात घेत असतांना पोलीस कारवाईला अडथळा निर्माण करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. संबंधित महिलेविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर प्रकार

नाशिक : शांततेचा भंग केला म्हणून दोघांना ताब्यात घेत असतांना पोलीस कारवाईला अडथळा निर्माण करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. संबंधित महिलेविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर प्रकार

अशी आहे घटना

ही घटना क्रांतीनगर झोपडपट्टीत घडली. संध्या विजय साळवे (रा.सप्तशृंगी मंदिराजवळ, क्रांतीनगर) असे संशयीत महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार संजय भिसे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. क्रांतीनगर भागात गुरूवारी (ता.14) सायंकाळी मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना सप्तशृंगी मंदिर परिसरातील नगरसेविका प्रियंका घाटे यांच्या कार्यालयावर लहान मुलांसह काही युवक आरडाओरड करीत पतंग उडवित होते. धोकेदायक ठिकाण असल्याने पोलिसांनी धाव घेत पतंग उडविणाऱ्या युवकांना हटकले. शांततेचा भंग केल्याप्रकरणी संकेत घाटे आणि राहूल घाटे या युवकांना पोलीसांनी ताब्यात घेत (एमएच 15 ईए 0228) या वाहनात बसवित असतांना ही घटना घडली. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात समज देण्यासाठी घेवून जात असतांना संशयित महिलेने आरडाओरड करीत वाहन अडवून पोलीस कारवाईला विरोध केला. यावेळी संशयीत महिलेने कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी आरेरावी करीत धाकदडपशा करून धमकी दिली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case registered against a woman for obstructing work of police nashik marathi news