धोका वाढतोय...मनमाड शहरातील 'या' भागात सर्वाधिक रुग्णसंख्या!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

मालेगाव अन् नाशिकमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना, आता जिल्ह्यातील मनमाड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहते आहे. शुक्रवारी (ता. 12) दुपारी 21 रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात मनमाड शहरातील बोहरी कॅम्पातील सर्वाधिक रुग्ण आहेत तर, जिल्ह्यातही सध्या नांदगाव तालुक्‍यात सर्वाधिक 20 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

नाशिक : मालेगाव अन् नाशिकमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना, आता जिल्ह्यातील मनमाड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहते आहे. शुक्रवारी (ता. 12) दुपारी 21 रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात मनमाड शहरातील बोहरी कॅम्पातील सर्वाधिक रुग्ण आहेत तर, जिल्ह्यातही सध्या नांदगाव तालुक्‍यात सर्वाधिक 20 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

बोहरी कॅम्पातील 9 रुग्ण

नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी (ता. 12) दुपारी 61 प्राप्त झाले असता, यात 41 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 21 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मनमाड शहरातील बोहरी कॅम्पातील 9 रुग्ण असून यात अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. तर, इगतपुरी तालुक्‍यातील शेणित आणि भरविर येथील प्रत्येकी 1-1, पिंपळगाव बसवंतमधील दोन, नाशिक तालुक्‍यातील मांडसांगवीत आणखी एक, येवल्यातील गंगा दरवाजा येथील 50 वर्षीय महिला आणि बालाजी गल्लीतील 62 वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आहे.

 हेही वाचा > PHOTOS : दुर्दैवी घटना! पोलीस अधिकारीच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा..सुट्टीनिमित्त घरी जातानाच काळाचा घाला..पाहा

निफाड तालुक्‍यातील चाटोरी येथील 65 वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आहे. तर नाशिकमधील व्दारका परिसरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय अंधेरी (मुंबई) येथील 47 वर्षीय रुग्ण आणि मोखाड्याची 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. अशा रितीने 21 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे.  

 हेही वाचा > धक्कादायक! ३५ वर्षांचा घरोबा..सख्खे शेजारी..कुटुंबासाठी धावणाऱ्यांचाच विश्वासघात

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caution, Corona's danger is increasing in Manmad nashik marathi news