धक्कादायक! ३५ वर्षांचा घरोबा..सख्खे शेजारी..कुटुंबासाठी धावणाऱ्यांचाच विश्वासघात

jondhale murder.jpg
jondhale murder.jpg

नाशिक / महालपाटणे : जोंधळे व गांगुर्डे घराण्याचे गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून घरोब्याचे व सलोख्याचे संबंध होते.दोघे कुटुंब जरी भिन्न जातीची असली तरी ते एकमेकांना प्रत्येक गोष्टीत सहकार्य करायचे. आरोपी अंकलेश यांच्या घर बांधकामासाठी नुकतेच संदीप जोंधळे याने पंचवीस हजाराची मदत केली होती, सर्वजण एकमेकांच्या शेतीच्या कामांना मदत करायचे, पण काल पहाटे(दि.11) अंकलेशच्या मनात वेगळाच कट शिजला आणि त्याने माणुसकीला आणि मानवधर्माला काळिमा फासणारे कृत्य केले.

असा घडला प्रकार

देवपूरपाडे (ता.देवळा) येथील चिंचमळा शिवारात विजय छबु जोंधळे यांच्या राहत्या घरी शेजारीच राहणाऱ्या अंकलेश गांगुर्डे (वय.20) या युवकाने चोरी करण्याच्या उद्देशाने हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला. भरझोपेत असलेल्या जिजाबाई जोंधळे(वय 51) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवे असा सुमारे 65000 (पासष्ट हजारांचा) ऐवज काढून घेतला.आत झोपलेला मुलगा संदीपला पडवीत कशाचातरी आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडताच दबा धरून बसलेला आरोपी अंकलेश याने त्याच्या डोक्यातही कुऱ्हाडीचा वार केला.त्यात संदीप जबर जखमी झाला. संदीपची पत्नी राणी हिने ही झटापट पाहून मागच्या दरवाजाने आरडाओरडा केल्याने तिच्यामागेही आरोपी धावत सुटला तिच्या पोटात व पाठीत कुऱ्हाडीच्या दांड्याने घाव घातले. आरडाओरडा ऐकून शेजारील रहिवासी धावले व त्यांनी आरोपी अंकलेशला पकडून चांगला चोप दिला.

घरोबा असणारे शेजारीत निघाले वैरी
ही घटना (ता.11) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.त्याचवेळी दुसरीकडे आरोपीचे वडील अरुण बाबुराव गांगुर्डे(वय 51) भाऊ कमलेश (वय23) शेतात पळत असताना स्थानिकांनी त्यांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.दरम्यान जखमी संदीप जोंधळे याच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपी अंकलेश गांगुर्डे, अरुण गांगुर्डे, कमलेश गांगुर्डे व आरोपीची आई विमलबाई गांगुर्डे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, पो.नाईक चंद्रकांत निकम, सुदर्शन गायकवाड हे करीत आहेत.

माणुसकीला आणि मानवधर्माला काळिमा फासणारे कृत्य
मयत जिजाबाई जोंधळे व आरोपीच्या घराण्याचे गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून घरोब्याचे व सलोख्याचे संबंध होते.दोघे कुटुंब जरी भिन्न जातीची असली तरी ते एकमेकांना प्रत्येक गोष्टीत सहकार्य करायचे. आरोपी अंकलेश यांच्या घर बांधकामासाठी नुकतेच संदीप जोंधळे याने पंचवीस हजाराची मदत केली होती, सर्वजण एकमेकांच्या शेतीच्या कामांना मदत करायचे, पण काल पहाटे(दि.11) अंकलेशच्या मनात वेगळाच कट शिजला आणि त्याने माणुसकीला आणि मानवधर्माला काळिमा फासणारे कृत्य केले.पैशाच्या व किरकोळ सोन्याच्या लोभापायी संकटकाळात मदतीला धावून येणाऱ्या कुटुंबावरच कुऱ्हाड चालवली. या कृत्याबाबत परिसरात तीव्र चीड,संताप व हळहळ व्यक्त होत आहे. आरोपीने रात्री घरमालक परगावी गेल्याची खात्री करून घेतली व भल्या पहाटे सकाळी सकाळी आपला डाव साधला.आरोपीला व त्याला साहाय्य करणाऱ्या त्याच्या घरच्या लोकांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com