असाही वाढदिवस! चिमुरड्याच्या साठवलेल्या पैशातून अमरधाम स्मशानभूमीसाठी 'अनोखी' भेट

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 14 September 2020

अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसासाठी मोठा खर्च केला जातो. सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. रुद्रसिंह परदेशी याने चौथ्या वाढदिवसानिमित्त असाच कौतुकास्पद वाढदिवस साजरा केला आहे,

नाशिक  : अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसासाठी मोठा खर्च केला जातो. सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. रुद्रसिंह परदेशी याने चौथ्या वाढदिवसानिमित्त असाच कौतुकास्पद वाढदिवस साजरा केला आहे,

अमरधामसाठी अनोखी भेट

मोरवाडी येथील ३० ते ३२ वर्षांपासून असलेल्या अमरधाममध्ये लाकूड वाहतुकीची काहीही सोय नव्हती. त्यामुळे त्याठिकाणी लाकड वाहून नेण्यासाठी ५०० ते ७०० किलोपर्यंचा वजन वाहून नेणारा लोखंडी चारचाकी हाताने ओढणारा गाडा स्वर्गीय रतनसिंह बाबूसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ दिला. रुद्रसिंह परदेशी याने चौथ्या वाढदिवसानिमित्त मुलाने वाढदिवसासाठी साठवलेल्या पैशातून अमरधामला लाकडे वाहून नेण्यासाठी लागणारा हातगाडा भेट दिला. रुद्रसिंह परदेशी याने चौथ्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता ही भेट दिली आहे.विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्याकडे हा गाडा सुपूर्द करण्यात आला. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत लाकडं वाहून नेण्यासाठी कुठलीही सोय नाही. आता लाकडं वाहून नेण्यासाठी लोखंडी गाडा उपलब्ध झाल्याने, मोरवाडी स्मशानभूमीत सोय झाली. यानंतर उंटवाडी व पंचवटी येथील अमरधामला हातगाडी देणार असल्याचे वडील अक्षय परदेशी यांनी सांगितले.

 नाशिकची आई गोदामाईचे अध्यक्ष सचिन महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, रवींद्र शिंदे, आकाश परदेशी, वैकुंठ अमरधामचे व्यवस्थापक अकबर मनियार लाला मनियार आदी उपस्थित होते.

संपादन  - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate birthday gift to Amardham nashik marathi news