सीईटीच्‍या तारखांमध्ये पुन्‍हा एकदा बदल; नोव्‍हेंबरपर्यंत चालणार परीक्षा

अरुण मलाणी
Wednesday, 30 September 2020

राज्‍यातील व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात असते. या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे पुढील प्रक्रिया राबविली जाते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक ठप्प झाले होते.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे बारगळलेल्‍या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक गेल्‍या २१ सप्‍टेंबरला जाहीर केले होते. परंतु काही विद्यापीठ, महाविद्यालयांच्‍या परीक्षांच्‍या तारखा लक्षात घेता सीईटीच्‍या वेळापत्रकांत दुरूस्‍तीची मागणी केली होती. त्‍यानुसार सीईटीच्‍या वेळापत्रकात पुन्‍हा एकदा बदल केला असून, सुधारीत वेळापत्रकानुसार आता १० ऑक्‍टोबरपासून सीईटी परीक्षांना सुरवात होईल. नोव्‍हेंबरपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक सीईटी परीक्षा पार पडणार आहे. 

तारखांमध्ये बदल करण्याची मागणी

राज्‍यातील व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात असते. या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे पुढील प्रक्रिया राबविली जाते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक ठप्प झाले होते. यापूर्वीच शैक्षणिक वर्षाला विलंब होत असतांना, तसेच जेईई मेन्‍स, नीट सारख्या परीक्षा घेतल्‍या गेल्‍यानंतर सीईटी सेलमार्फत राज्‍यस्‍तरीय सीईटी परीक्षांचेही वेळापत्रक जारी केले होते. परंतु या वेळापत्रकातील तारखा अन्‍य काही विद्यापीठाच्‍या परीक्षांसोबत येत असल्‍याने तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे केली होती. त्‍यानुसार पुन्‍हा एकदा सुधारीत वेळापत्रक सीईटी सेलतर्फे जारी केलेले आहे. प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) व परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्‍या निर्णयांसाठी संबंधित सीईटी परीक्षेच्‍या संकेतस्‍थळाला भेट देत राहावे, असा सल्‍ला विद्यार्थ्यांना दिला आहे. 

असे आहे तारीखनिहाय सीईटी परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक- 

१० ऑक्‍टोबर : बी.एचएमसीटी सीईटी 
११ ऑक्‍टोबर : एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी 
१८ ऑक्‍टोबर : बीए बी.एस्सी. बी.एड. (इंटीग्रेटेड) सीईटी 
२१ ते २३ ऑक्‍टोबर : बी.एड. ॲण्ड बी.एड. (ईएलसीटी) सीईटी 
२७ ऑक्‍टोबर : बी.एड.एम.एड. इंटीग्रेटेड सीईटी 
एम.आर्क सीईटी 
एम.एचएमसीटी सीईटी 
२८ ऑक्‍टोबर  एमसीए सीईटी 
२९ ऑक्‍टोबर : एम.पीएड. सीईटी 
३१ ऑक्‍टोबर ते ३ नोव्‍हेंबर : एम.पी एड. फिल्‍ड टेस्‍ट 
२ व ३ नोव्‍हेंबर : एलएलबी (३ वर्षे) सीईटी 
४ नोव्‍हेंबर : बी.पी.एड. सीईटी  
५ ते ८ नोव्‍हेंबर : बी.पी.एड. फिल्‍ड टेस्‍ट 
५ नोव्‍हेंबर  : एम.एड. सीईटी 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cet exam time table change nashik marathi news