इतिहास व इतर गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे" - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 31 January 2020

महाविकास आघाडीबाबत भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहास आणि इतर गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे. त्याची सगळ्यांची जबाबदारी आहे.

नाशिक :  महाविकास आघाडीबाबत भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहास आणि इतर गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे. त्याची सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य करायला हवे. सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही. त्यासाठी आपणही सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहोत.  

लोणावळा-खंडाळा-महाबळेश्‍वरप्रमाणे इगतपुरीमध्ये "हिल स्टेशन' 

लोणावळा-खंडाळा-महाबळेश्‍वरप्रमाणे इगतपुरीला "हिल स्टेशन' व्हावे यासाठीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी न मिळाल्यास पर्यटन विभागाकडून निधी घेण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. 30) विभागीय आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडले...

ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या कार्यकाळातील तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडले आहेत. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्‍लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही कामे आणि अपूर्ण असलेली कामे आहेत. त्यावर निर्णय होतील. विमानसेवेच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chagan bhujbal on recent government Nashik Marathi Political News