चांदोरीकर रमले चंदेरी दुनियेत! गोदाकाठी दीर्घकाळानंतर चित्रपटाचे चित्रीकरण

सागर आहेर
Monday, 28 September 2020

चित्रपटनगरीलादेखील या सौंदर्याची भुरळ पडल्याने येथे चित्रीकरणाला विशेष पसंती दिली जाते. यातच लॉकडाउनचे नियम चित्रीकरणास काहीसे शिथिल झाल्यानंतर दीर्घकाळानंतर चांदोरीकर चंदेरी दुनियेत रंगले. औचित्य होते ते 'आफत-ए-इश्क' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे.

नाशिक : (चांदोरी) गोदाकाठाला लाभलेल्या निसर्ग देणगीमुळे पर्यटनासाठी हा परिसर सर्वांनाच खुणावत असतो. चित्रपटनगरीलादेखील या सौंदर्याची भुरळ पडल्याने येथे चित्रीकरणाला विशेष पसंती दिली जाते. यातच लॉकडाउनचे नियम चित्रीकरणास काहीसे शिथिल झाल्यानंतर दीर्घकाळानंतर चांदोरीकर चंदेरी दुनियेत रंगले. औचित्य होते ते 'आफत-ए-इश्क' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे. 

गोदाकाठी 'आफत-ए-इश्क' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण 

कोरोनामुळे मुंबईतील चित्रनगरीसह पुणे, सातारा जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले होते. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने या परिसरात चित्रीकरण करण्याची अनेक निर्मात्यांनी मागणी केली होती. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या गोदावरी नदी व गोदाकाठाचे छायाचित्र बघून नाशिक येथील एकदंत लाइन प्रोड्यूसरचे अमित कुलकर्णी यांनी चांदोरी येथे भेट देऊन 'आफत-ए-इश्क' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मनोदयदेखील व्यक्त केला. त्यानुसार २६ ते २७ सप्टेंबर या दोन दिवस चांदोरी येथील गोदाकाठ परिसरात 'आफत-ए-इश्क' या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. 

चांदोरीकर चंदेरी दुनियेत रंगले...

चित्रपटात अभिनेत्री इला अरुण, नेहा शर्मा, अभिनेता नमित दास, दीपक डोब्रियल, दर्शन जरीवाल आदींसह स्मिता प्रभू, पल्लवी कदम आदींची मुख्य भूमिका आहे. दिग्दर्शक इंद्रजित नटोजी, तर लाइन प्रोड्यूसर म्हणून नाशिकच्या एकदंत फिल्मचे अमित कुलकर्णी काम बघत आहेत. निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पाहणी करून कोरोनासंबंधीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. 

स्थानिकांना रोजगार 

सध्या एक्सल व्हिजन झी स्टुडिओ ओरिजिनलने सुमीत खुराणा व प्रणव शास्त्री यांच्या माध्यमातून आफत-ए-इश्क या चित्रपटाचे चित्रीकरण चांदोरीमध्ये संपन्न होऊन ७० हून अधिक युवकांना सेट उभारणी, एकोमोडेशन, वाहतूक याकामी येथील रोजगार प्राप्त झाला. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

चांदोरीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करून अनेक दिवसांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले गेले. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला. - कल्पेश गायखे, संघर्ष इव्हेंट मॅनेजमेंट 

चांदोरीसह संपूर्ण गोदाकाठ भागात चित्रीकरणास वाव असून, यापुढेही प्राधान्य दिले जाईल. - अमित कुलकर्णी, एकदंत लाइन प्रोड्यूसर, नाशिक

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in chandori Afat-e-Ishq movie shooting has been completed nashik marathi news