esakal | 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

Measures to prevent black market remdesevir injection nashik marathi news

मालेगाव शहरात रेमडेसिव्हिर या इंजेक्‍शनचा पुरवठा सुरळीतपणे व वाजवी किमतीत होण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनज्या मेडिकल स्टोअर्सवर उपलब्ध आहे त्या दुकानांची माहिती जमा करण्यात आली.

'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपाययोजना आखल्या आहेत. त्यात, मेडिकल दुकानांनी दर्शनी भागातच इंजेक्शन साठ्याची माहिती प्रदर्शित करण्याचे निर्बंध घातले आहेत. 

मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देष

मालेगाव शहरात रेमडेसिव्हिर या इंजेक्‍शनचा पुरवठा सुरळीतपणे व वाजवी किमतीत होण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनज्या मेडिकल स्टोअर्सवर उपलब्ध आहे त्या दुकानांची माहिती जमा करण्यात आली. दहा मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित औषध विक्रेत्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला असून, दहाही औषध विक्रेत्यांना रोज त्यांच्या दुकानाच्या दर्शनी भागावरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन किती साठा आहे, एका इंजेक्शनची किंमत अमुक आहे, असे फलक लावण्याचे निर्देश दिलेले आहेत.  

हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

जिल्ह्यात एक हजार ११० नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता. २७) १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या आता एक हजार ३१४ झाली आहे. दिवसभरात एक हजार ११० नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या एक हजार ३८३ राहिली. गेल्‍या काही दिवसांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या रोज पंधराहून अधिक असल्‍याचे चित्र आहे. आतापर्यंत सर्वाधिक ७१६ मृत्‍यू नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. तर नाशिक ग्रामीणमधील ४१९ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. मालेगाव महापालिका हद्दीत १५१, तर जिल्‍हाबाह्य २८ रुग्‍णांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - रोहित कणसे