घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची वारंवार मागणी; बंधाऱ्यात उडी मारत विवाहितेची आत्महत्या

धनंजय वावधने
Thursday, 15 October 2020

रूपाली हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी सासराकडच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होते. यातच जमीन लेव्हल व घर बांधण्यासाठी माहेरून 20 हजार रुपये आणण्यास सांगितले होते.

सोग्रस (जि.नाशिक) : रूपाली हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी सासराकडच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होते. यातच जमीन लेव्हल व घर बांधण्यासाठी माहेरून 20 हजार रुपये आणण्यास सांगितले होते.

घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी

पोलिसात दामू कडाळे यांनी दिलेल्या तक्रारी रूपाली हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी सासराकडच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होते. यातच जमीन लेव्हल व घर बांधण्यासाठी माहेरून 20 हजार रुपये आणण्यास सांगितले होते. मात्र या छळास कंटाळून रूपाली हिने पळसवाडी नालाबंडिंग बंधाऱ्यात मंगळवारी (ता.१३) उडी मारत आत्महत्या केली. आज (ता.१४) सकाळी पोलिसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी संशयित समाधान गोधडे, हिराबाई गोधडे, आणि नामदेव गोधडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदूरटेक (ता. चांदवड) येथील विवाहिता हिने सासरकडच्या छळास कंटाळून बंधाऱ्यात उडी मारत आत्महत्या केली. रूपाली समाधान गोधडे (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandwad married woman suicide nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: