वापरण्यासाठी कार नेली आणि कारची परस्पर विक्री

पोपट गवांदे
Wednesday, 18 November 2020

कर्डक याने वापरण्यासाठी नेली होती. मात्र संशयीताने लोणे यांचे बनावट कागदपत्र तयार केले. आणि परस्पर विकली.

नाशिक : वापरण्यासाठी दिलेली कार एकाने बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विकल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दशरथ त्र्यंबक लोणे (३९ रा.भुसारे मळा,दाढेगावरोड,पाथर्डी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

वापरण्यासाठी कार नेली आणि कारची परस्पर विक्री

रितेश विश्राम कर्डक (३६ रा.संस्कार रेसि.खोडेनगर) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार कर्डक आणि लोणे एकमेकांचे परिचीत असून गेल्या सप्टेंबर महिन्यात लोणे यांची झायलो कार (एमएच १५ डीएम ८०७०) कर्डक याने वापरण्यासाठी नेली होती. मात्र संशयीताने लोणे यांचे बनावट कागदपत्र तयार करून ही कार पंकज केशव पाटील (रा.अकोले रोड,अमरावती) यांना परस्पर विक्री केली. दिवाळी निमित्त लोणे आपल्या वाहनाच्या चौकशी साठी कर्डक यांच्याकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला.  

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheat and fraud of car sale nashik marathi news

Tags
टॉपिकस