esakal | "राज्यात ६ महिन्याचा अन्नधान्याचा स्टॉक उपलब्ध, काळजी करू नका"
sakal

बोलून बातमी शोधा

CHHAGAN BHUJBAL.jpg

महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये पडून आहेत, असंही छगन भूजबळ यांनी नमूद केलं. "जो जिथं आहे, तिथं थांबावे" हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करावे. तसेच तेलाची जहाजे बंदरात येण्याबद्दल अडचणी होत्या, त्यात मार्ग काढला असून तेलाचा राज्यात तुटवडा भासणार नाही

"राज्यात ६ महिन्याचा अन्नधान्याचा स्टॉक उपलब्ध, काळजी करू नका"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,  महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये पडून आहेत, असं मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.अन्नधान्य, औषधं, दुध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही. तुमच्या या वस्तू तुमच्या जवळच्या वितरण केंद्रावर पोहचवण्याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत. असेही छगन भुजबळ म्हणाले, 


१ लाख लोकांना शिवभोजन थाळी

तसेच राज्यात आजपासून १ लाख लोकांना शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली असून त्याची किंमत प्रत्येकी 5 रुपये असेल (शहरात थाळी मागे ४५ आणि तालुकास्तरावर ३० रुपये अनुदान सरकार देणार) तसेच याचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून  बेघर, स्थलांतरित, विद्यार्थी यांना या थाळीचा लाभ मिळेल यासाठी १६० कोटींची तरतूद करण्यात येत असून शिवभोजन केंद्रातून पॅकिंग स्वरूपात थाळी मिळेल असेही भुजबळांनी सांगितले. यासाठी काळजी घेण्यात येत असून भांडी निर्जंतुक, कामगारांना मास्क वापरणे, सॅनिटायझरने हात धुण्यासारख्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

तेलाचा राज्यात तुटवडा भासणार नाही

महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये पडून आहेत, असंही छगन भूजबळ यांनी नमूद केलं. "जो जिथं आहे, तिथं थांबावे" हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय
त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करावे. तसेच तेलाची जहाजे बंदरात येण्याबद्दल अडचणी होत्या, त्यात मार्ग काढला असून तेलाचा राज्यात तुटवडा भासणार नाही

go to top