esakal | "शेखर गवळींच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी" - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

shekhar gavali.jpg

नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इगतपुरीतील मानस हॉटेलपाठीमागच्या परिसरातील डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेल्या ग्रुपमधील महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले आहेत.

"शेखर गवळींच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी" - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इगतपुरीतील मानस हॉटेलपाठीमागच्या परिसरातील डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेल्या ग्रुपमधील महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले. त्यांना शोधण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, अंधार आणि खोलदरी तसेच, २५० ते ३०० फूट डोहामुळे शोधकार्यात अनेक अडचणी आल्या आणि अखेर शोध थांबवावा लागला. मात्र सकाळी (ता.२) शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला असून शव विच्छेदन करून नाशिकला पार्थिव आणून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांची श्रध्दांजली

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचे ट्रेकिंग दरम्यान इगतपुरी येथे पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची बातमी समजली. अत्यंत दु:ख झालं. शेखर गवळी उत्तम प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय गवळी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ