esakal | गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता
sakal

बोलून बातमी शोधा

gurakhi.jpg

नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी तो मळ्याकडे गेला. खूप वेळा झाला तरीही न परतल्याने घरच्यांची शोधाशोध सुरु झाली. अनेक तर्क - वितर्कांनंतर तो भेटलाहा मात्र...कुटुंबियांचा आक्रोश..वाचा काय घडले?

गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक : (म्हसरूळ) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी तो गेला. खूप वेळा झाला तरीही न परतल्याने घरच्यांची शोधाशोध सुरु झाली. अनेक तर्क - वितर्कांनंतर तो भेटलाहा मात्र...कुटुंबियांचा आक्रोश..वाचा काय घडले?

अशी आहे घटना

मखमलाबाद शिवारातील मानकर मळा येथील तेरावर्षीय प्रशांत भरतभाई भरवाड (वय १३) हा नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी मेघराज बेकरी पाठीमागील परिसरात रविवार (ता. ३०) सकाळी गेला होता. सुमारे साडेदहाच्या दरम्यान या ठिकाणी असलेल्या पडक्या विहिरीत तोल निसटून पडला. या घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना समजताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी आहिरे, पोलिस हवालदार बाळा पारनकर, भोईर, देशमुख यांनी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करता अग्निशमन दल व गोदा घाटावरील जीवरक्षक दलास पाचारण करण्यात आले.

हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

या वेळी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन एस. जी. कानडे, फायरमन एस. पी. मेंद्रे, बी. आर. गायकवाड, एम. एस. गायकवाड, यू. आर. झिटे, वाहनचालक व्ही. एम. शिंदे यांनी जवळपास सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तेरावर्षीय प्रशांतला विहिरीतून काढण्यात आले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात