धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..

amboli dam.jpg
amboli dam.jpg

नाशिक : आदिवासी विकास संचलित निवासी शासकीय आश्रमशाळेची आंबोली ( ता. त्र्यंबकेश्वर) धरणावर सहल गेली होती. बुधवार ( ता.८) दुपारी एक वाजेदरम्यान वनभोजनासाठी गेलेल्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थाचा पाण्यात बुडून करून अंत झाला. तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले असून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशी घडली घटना...
निवासी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थांना सालाबादप्रमाणे वनभोजनासाठी आंबोली डॅम येथील धरण परिसरात नेण्यात आले होते. विद्यार्थी हसत खेळत विविध खेळ खेळले. दुपारची जेवणाची वेळ झाली अन् विद्यार्थी जेवणासाठी एकत्रितपणे बसले अशातच दोन विद्यार्थी कमी असल्याचे मुख्याध्यापक बी.बी.खैरनार यांच्या लक्षात येताच तातडीने डॅमवर धाव घेतली, त्यावेळी इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी रोशन उत्तम धोंगडे ( वय ९ ) हा मदतीसाठी आवाज देत होता. त्यावेळी समयसूचकता पाळत आपल्या सहकार्यासामवेत पाण्यात उड्या घेत रोशनला बाहेर काढण्यात यश आले तर उत्तम विलास धोंगडे ( वय ९ ) हा  विद्यार्थी देखील याच ठिकाणी असला पाहिजे म्हणून पाण्यात तपास सुरु केला असता काही वेळाने तो भेटला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

आकस्मिक मृत्यूची नोंद

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस उपअधिकारी भीमाशंकर ढोले,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजाराम कर्पे,उपनिरीक्षक युवराज अहिरे,सहाय्यक उपनिरीक्षक सुनील आहेर धाव घेत तातडीने विद्यार्थांना जिल्हा रुगणालयात रुग्ण वाहिकेने पाठविण्यात आले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजाराम कर्पे हे करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com