दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर परिसरात शालेय मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच काही खेळणी आहेत. या खेळण्यांवर खेळण्यासाठी बाहेरील मुलेही येत असतात. सुरक्षा रक्षक अशा बाहेरील विद्यार्थ्यांना हटकण्याचे काम सातत्याने करतात. शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला.

नाशिक : अवघ्या १० वर्षांच्या मुलांनी तीन शालेय बसच्या काचेची तोडफोड केली. या घटनेमुळे पोलिसांसह पालकांनाही धक्का लागला आहे.. पोलिसांनी या बालकांना समज देत सोडून तर दिले. मात्र विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे पालक, शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला.

असे घडले सर्व..

गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर परिसरात शालेय मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच काही खेळणी आहेत. या खेळण्यांवर खेळण्यासाठी बाहेरील मुलेही येत असतात. सुरक्षारक्षक अशा बाहेरील विद्यार्थ्यांना हटकण्याचे काम सातत्याने करतात. शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला. शनिवारी जोशी वाडा परिसरातील ९ ते १० वर्षांची मुले शाळेतील खेळण्यांवर, मैदानावर खेळण्यासाठी आली. त्यावेळी शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले.त्यांना घरी जाण्यास बजावत मैदानाबाहेर काढले. याचा राग आल्याने सुरक्षारक्षक किंवा शाळेला अद्दल घडविण्यासाठी या तीनही मुलांनी एकत्र येत शनिवारी अभिनव बालविकास मंदिर गाठले. अंधाराचा फायदा घेत सुरक्षा रक्षकाची नजर चुकवत त्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश केला. आजूबाजूचे दगड उचलत शाळेच्या आवारात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या उभ्या असलेल्या बसगाडय़ांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मुलांच्या या दगडफेकीत शाळेच्या तीन गाडय़ांच्या काचा फुटल्या. आवाजाने सुरक्षारक्षकांसह इतरांनी वाहनतळाकडे धाव घेतल्यावर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत संशयित पळून गेले.

हेही वाचा > मुख्याध्यापकानेच केले 'असे' लाजीरवाणे कृत्य...की गेला थेट जेलमध्येच!

मुलांचे वय पाहून पोलीसही चक्रावले

सोमवारी (ता.३०) सकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकाराविषयी शालेय व्यवस्थापनाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तीनही मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुलांनी काच फोडण्याची दिलेली कारणे आणि त्यांचे वय पाहून पोलीसही चक्रावले.

हेही वाचा >  रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten year old boys broke the glass of buses from revenge Nashik marathi News