esakal | अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
sakal

बोलून बातमी शोधा

bride.jpeg

अवघ्या १३ वर्षांची असताना विवाह झालेल्या त्या बालिकावधूची जीवनयात्रा संपली.. हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच ठरला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या १३ वर्षांची असताना विवाह झालेल्या त्या बालिकावधूची जीवनयात्रा संपली.. हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच ठरला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच

दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे मे २०२०मध्ये म्हणजे अगदी कडेकोट लॉकडाउन असताना हा बालविवाह पार पडला होता. विवाहाच्या साडेसहा महिन्यानंतर मुलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बालवधूसह तिचे सासरचे करंजवणला पोहोचले. २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घरातील गरम पाण्याने भरलेला ड्रम सांडला आणि त्यात बालवधूसह तिची नणंद भाजली. पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना दिंडोरी आणि पुढे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मुलीच्या आईसह सासरच्यांमध्ये वाद उभे राहिले आणि त्यातूनच बालविवाहाचा प्रकार आला. पुढे याच वादामुळे बालवधूच्या आईने मुलीला कधी दिंडोरी, तर कधी नाशिक येथे उपचार दिले. अनेक उपाय करण्यात आले. मात्र, तिचे दुखणे वाढतच गेले आणि तिचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्येच असलेली तिची नणंद बरी झाली.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिची मृत्युशी झुंज अखेर संपली

माहेरीच एका अपघातात भाजलेल्या बालवधूवर २४ नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते. दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिची मृत्युशी झुंज अखेर संपली. बालविवाहाचा गुन्हा नोंद असलेल्या पोलिस ठाण्यातच आता मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीच्या आईसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता बिडवे (सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी, ता. इगतपुरी), तसेच बालवधूची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईसह चौघांवर गुन्हा

बालविवाहप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल असून, मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कलम ३०४ (अ) नुसार संबंधित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत म्हणाले, 'या प्रकरणी सासरच्या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले; तसेच त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. मुलीच्या आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.'

go to top