संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली..खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

पुन्हा कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. अरूणने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता. सविस्तर प्रकार असा की... 

नाशिक : पुन्हा कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. अरूणने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता. सविस्तर प्रकार असा की... 

विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहताच कुटुंबियांचा आक्रोश

चिराई येथील शिवारात असलेल्या सामाईक गटातील (गट क्र. १०५/२) मधील शेतात वास्तव्य करीत असलेले अरूण पोपट आहिरे (वय ४०) हे सोमवार (ता. २७) सायंकाळपासून बाहेर होते. गेल्या अनेक दिवसांपासून डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने विवंचनेत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. कुटुंबियासह मित्रांनी अरूणचा रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी शोध घेतला मात्र मिळून आले नाही. सकाळी पुन्हा कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. अरूणने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता. कुटुंबियांचा उदरनिर्वाहसाठी अरूण पारंपारिक शेती सांभाळून चिराई घाटाजवळील देवीच्या परिसरात पुजेचे साहित्य व नारळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात 'तो' वेदनेने विव्हळत होता...पण माणुसकी हरली..वाचा काय घडले

अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अरूणने नातेवाइकांकडून हातउसणवार व सातबा-यावर महाराष्ट्र बॅंकेचा लाखाचा बोजा दर्शविला आहे. कर्ज फेडावे तरी कसे? या विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. जायखेडा पोलिसांना महडच्या पोलिस पाटीलांनी माहिती दिली असता पोलिस हवालदार उमेश भदाणे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. नामपुर येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अरूणच्या पश्चात विधवा आई, पत्नी व दोन मुलं आहेत. चिराईत अत्यंत शोकाकुल वातावरणात अरूणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवरंजन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश भदाणे करीत आहेत.

हेही वाचा > दुर्दैवी! घरात सॅनिटायझरचा उडाला भडका.. महिला पेटली ..सॅनिटायझेशन करताना हादरवणारी घटना

(अंबासन) बागलाण तालुक्यातील चिराई येथील शिवारात तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अरूण पोपट आहिरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून सविस्तर प्रकार असा की... 

रिपोर्ट - दिपक खैरनार

संपादन - ज्योती देवरे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chirai farmer committed suicide nashik marathi news