दिल्लीतील वाढत्या कोरोनामुळे स्वच्छ सर्वेक्षण अडचणीत; उपक्रम लांबण्याची शक्यता

विक्रांत मते
Wednesday, 2 December 2020

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात नाशिक शहराचा देशात अकरावा क्रमांक, तर राज्यात नवी मुंबईपाठोपाठ दुसरा क्रमांक आला. सदरची बाब जरी नाशिककरांच्या दृष्टीने समाधानकारक असली तरी नाशिककरांची इच्छा पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याची होती.

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचे स्वप्न मागील वर्षी भंगल्याने नाशिक महापालिकेने यंदा पुन्हा एकदा कंबर कसली खरी; परंतु दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वेक्षणासाठी येणारे पथक नाशिकमध्ये दाखल होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यात राज्य शासनाने दिल्लीतून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्याने अडचणीत अधिक भर पडली आहे.

नाशिक देशात अकरावे

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात नाशिक शहराचा देशात अकरावा क्रमांक, तर राज्यात नवी मुंबईपाठोपाठ दुसरा क्रमांक आला. सदरची बाब जरी नाशिककरांच्या दृष्टीने समाधानकारक असली तरी नाशिककरांची इच्छा पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याची होती. परंतु प्रमाणपत्र गटात तब्बल १५१ गुण कमी मिळाल्याने नाशिक मनपाची ही संधी हुकली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार गटांत सहा हजार गुण होते. त्यात महापालिकेला प्रत्यक्ष पाहणीत १,५०० पैकी १,४४१ गुण मिळाले, नागरिकांचा प्रतिसाद गटात १,५०० पैकी १,२५६ गुण मिळाले. सेवा पातळी प्रगतीतमध्ये १,५०० पैकी १,३३२ गुण मिळाले, तर प्रमाणपत्र सादरीकरणात १,५०० पैकी अवघे ७०० गुण मिळाले. १५१ गुण कमी मिळाल्याने नाशिक पहिल्या दहा शहरांमध्ये आले नाही.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

स्वच्छ सर्वेक्षण लांबणीवर

नव्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. ३२ नोडल ऑफिसर नियुक्ती करण्याबरोबरच नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग, प्रमाणपत्र गटासाठी योजना आखणे, सेवा पातळीत वाढ करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. परंतु स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची तयारी करत असताना दिल्लीत वाढत्या कोरोना संसर्गाचा अडथळा निर्माण होताना दिसत असून, सर्वेक्षणासाठी पथक दाखल होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतून पथक आले तरी प्रथम त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार असल्याने स्वच्छ सर्वेक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात कोरोनाचा समावेश

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कोरोना या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी महापालिकेने काय उपाययोजना केल्या त्यासाठी शंभर गुण दिले जाणार आहेत. महापालिकेने गणेशोत्सव काळात मिशन विघ्नहर्ता मोहीम राबविली होती. त्यात नागरिकांनी घरातच मूर्तीचे विसर्जन करताना गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clean survey in trouble due to rising corona in Delhi nashik marathi news