esakal | पेट्रोल दरवाढीसाठी ग्राहक स्वीकारताएत सीएनजीचा पर्याय! वाढत्या दराने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

बोलून बातमी शोधा

cng 1234.jpg}

लॉकडाउनमध्ये नोकरीच्या ठिकाणी किंवा समारंभासाठी पोचण्यासाठी चारचाकी मोटार घेतली खरी; पण पेट्रोल, डिझेलच्या दराचा भडका झाल्याने नागरिकांच्या पोटात गोळा आला आहे. हौसेने घेतलेली स्वप्नातील कार विकायची कशी आणि खिशालाही परवडायला हवी यातून पेट्रोल, डिझेलऐवजी सीएनजी गॅस हा पर्याय बहुतांश नागरिक स्वीकारताना दिसत आहेत.

nashik
पेट्रोल दरवाढीसाठी ग्राहक स्वीकारताएत सीएनजीचा पर्याय! वाढत्या दराने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले
sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : लॉकडाउनमध्ये नोकरीच्या ठिकाणी किंवा समारंभासाठी पोचण्यासाठी चारचाकी मोटार घेतली खरी; पण पेट्रोल, डिझेलच्या दराचा भडका झाल्याने नागरिकांच्या पोटात गोळा आला आहे. हौसेने घेतलेली स्वप्नातील कार विकायची कशी आणि खिशालाही परवडायला हवी यातून पेट्रोल, डिझेलऐवजी सीएनजी गॅस हा पर्याय बहुतांश नागरिक स्वीकारताना दिसत आहेत. प्रतिकिलोमीटर अवघे दोन रुपये एवढा खर्च येत असल्याने सीएनजीला वाहनधारकांची पसंती मिळत आहे. इंधन दरवाढीमुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक घरगुती गॅसचा वापर करीत असल्याने त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

पेट्रोल, डिझेलऐवजी सीएनजी गॅस पर्याय बहुतांश नागरिक स्वीकारताएत
पेट्रोल-डिझेलच्या दराची शंभरीकडे वाटचाल सुरू असून, इंधनाच्या वाढत्या दराने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. स्वतःच्या चारचाकी वाहनाने प्रवासाची सवय झाली. त्यात कोरोना संसर्गाची भीती असल्याने सार्वजनिक वाहनातून अद्यापही कुणी प्रवास करायला धजावत नाही. त्यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. यावर चारचाकी मोटारीसाठी सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) हा पर्याय वाहनचालकांच्या पसंतीला उतरतो आहे. विशेष म्हणजे सीएनजीचा खर्च प्रतिकिलोमीटरला पेट्रोलच्या तुलनेत अर्धा तर येतोच; शिवाय त्याचा स्फोटही होत नसल्याने तो सुरक्षित आहे. 

नाशिक ते मालेगावदरम्यान होणार पन्नास सीएनजीचे पंप 
पेट्रोलच्या दरवाढीला वैतागून अनेकांनी सीएनजीचे गॅसकिट बसविले आहे. रिक्षा, टॅक्सीचालकांनीही ते बसविले असून, प्रवासी वाहतूक करीत आहेत. नाशिक ते मालेगावदरम्यान अवघे दहा सीएनजी पंप आहेत. ओझर, पिंपळगाव बसवंत, वडाळीभोई, चांदवड या मोजक्या शहरांत ते आहेत. पण, एका पंपाला दिवसभरात बाराशे किलो एवढाच गॅस विक्रीसाठी मिळतो. त्या तुलनेत मागणी दुपटीने आहे. सीएनजीला प्राधान्य दिले जात असल्याने तेल कंपन्यांनी नाशिक ते मालेगावदरम्यान सर्वेक्षण केले आहे. सुमारे ५० सीएनजी पंप येत्या वर्षभरात कार्यान्वित होणार असल्याचे समजते. त्यामुळे महामार्गावर सीएनजीचे जाळे विस्तारणार आहे. 

म्हणून सीएनजीला पसंती 
सीएनजी : ६० रुपये किलो 
प्रतिकिलो : ३० किलोमीटर ॲव्हरेज 
प्रतिकिलोमीटर : दोन रुपये खर्च 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक


पेट्रोल : ९४ रुपये लिटर 
प्रतिलिटर : २० ते २२ किलोमीटर ॲव्हरेज 
प्रतिकिलोमीटर : अंदाजे रुपये ४.५० इतका खर्च 
पेट्रोल प्रतिलिटर दर : ९६ ते १०० रुपये लिटर 
प्रतिकिलोमीटर खर्च : पाच रुपये 

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

घरगुती गॅसच्या वापरावर हवी करडी नजर 
मालेगाव ते नाशिकदरम्यान महामार्गावर अवैधरीत्या प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. त्यात भर म्हणून वाहनांमध्ये चक्क घरगुती गॅस भरला जात असल्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. मात्र, याकडे पोलिसांसह प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दुर्लक्ष केल्याने घरगुती गॅस भरून अवैध वाहतूक अधिक फोफावली आहे. इंधन दरवाढीवर खासगी वाहनधारकांनी घरगुती गॅसचा उतारा शोधला आहे. मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भंगार वाहने राजरोसपणे वेगाने धावत पाठशिवणीचा खेळ करीत आहेत. त्या वाहनांना गॅसकिट बसवून घरगुती गॅसच्या सहाय्याने प्रवासी वाहतूक करण्याची मजल पोचली आहे. ओझर, वडाळीभोई, मालेगाव या ठिकाणी घरगुती गॅस वाहनामधून भरून दिला जात असल्याचे समजते. बिनदिक्कत असे प्रकार सुरू असून, त्याकडे प्रशासनाने करडी नजर न ठेवल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. 
 

इंधन दरवाढीमुळे सीएनजीकडे नागरिकांचा कल वाढला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. पण, येत्या वर्षभरात पन्नासहून अधिक गॅसपंप उभे राहणार आहेत. शिवाय पाइपलाइनने गॅसपुरवठा होणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन गॅसचे दर अधिक कमी होतील. -सतीश देशमाने, संचालक, देशमाने पेट्रोलियम, पिंपळगाव बसवंत