लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक 

Within two days after the wedding the bride fled Nashik crime news.jpg
Within two days after the wedding the bride fled Nashik crime news.jpg

नांदगाव (जि. नाशिक) : लग्न जमवणे हा आजकाल जोखमीचा विषय झाला आहे, जसं जून्या पारंपारिक पध्दती मागे पडत चालल्या आहेत, त्यासोबतच या प्रक्रियेत तरुणांची फसवणूक होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. असाच धक्कादायक अनुभव वडापाव  विकणाऱ्या निलेश दरेकर या तरुणाला आला.. नेमके काय घडले वाचा सविस्तर..

वडकीनाला येथे हातगाडीवर वडापावची विक्री करणाऱ्या नीलेश दरेकर याने नांदगावला राहणारे मामा व त्यांच्या मुलामार्फत लग्न जमत नाही म्हणून प्रयत्न सुरू केले होते. मामेभावाच्या मनमाड येथे राहणाऱ्या मित्राने मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील भवानीबाबा हे लग्न जमवतात, असे सुचविले. त्यानुसार भवानीबाबाच्या संपर्कात ते आले. येथूनच लग्न जमविण्याची कहाणी सुरू झाली.

अशी झाली फसवणूक

चांगली मुलगी दाखवितो, मात्र त्यासाठी ५० हजार रुपये लागतील, असे भवानीबाबाने सांगितले. तीन मुलींची छायाचित्रे मोबाईलवर पाठविली. त्यातील एक मुलगी नीलेशला पसंत पडली. ती नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एकरुखे येथील होती. मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला. त्यासाठी मुलीच्या आईला तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे भवानीबाबाने सांगितले. कोपरगावला कोर्ट बंद असल्याने त्याच दिवशी सर्व नांदगावजवळील मामाच्या गंगाधरी येथील शेतात आले. लग्नसोहळा रात्री झाला. दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी पुण्याला गेली.

सात जणांविरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकीनाला येथील वडापाव विक्रेता नीलेश दरेकर (वय ३४) याने विवाह जमवून फसवणूक करणाऱ्या टोळीत नगरच्या दोन महिलांसह मालेगाव-रावळगाव येथील एकूण चौघांचा समावेश असल्याची तक्रार दाखल केली. फिर्यादीनुसार वधूसह एकूण सात जणांविरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संतोष उगलमुगले (मालेगाव), योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर, विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे (रा. एकरुखे, ता. राहता, नगर), मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे अशी संशयितांची नावे आहेत. गंगाधरी येथे २४ जून २०२० ला ही घटना घडली होती.

आईची तब्येत बिघडली म्हणून गेली ती गेलीच

लग्नात पूजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख, ९० हजारांचे सोन्याचे व नऊ हजार १०० रुपयांचे चांदीचे दागिने नीलेशने घातले होते. सत्यनारायणपूजा झाल्यावर मध्यरात्री तिच्या आईची तब्येत बिघडली, असे सांगून एका कारमध्ये बसून ती निघून गेली. त्यानंतर नवऱ्या मुलाने अनेकदा फोन केले मात्र ती आलीच नाही.  लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेनंतर वधू तीन लाख ९९ हजारांचा ऐवज घेऊन परागंदा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com