नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्‍तीचे प्रमाण ९५.४६ टक्‍के, तर मृत्‍युदर १.७७ टक्‍के

test-kits-120.jpg
test-kits-120.jpg

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बाधित २९ मार्चला आढळल्यानंतर शुक्रवारी (ता. २७) रुग्‍णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. यात सप्‍टेंबरमध्ये सर्वाधिक ३८ हजार ४९० कोरोनाबाधित आढळले, तर नोव्‍हेंबरमध्ये आतापर्यंत सहा हजार ५०१ बाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्‍या एक लाख ६२६ बाधितांपैकी ९५ हजार ६२६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्‍तीचे प्रमाण ९५.४६ टक्‍के आहे, तर एक हजार ७८२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, मृत्‍युदर १.७७ टक्‍के आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्‍तीचे प्रमाण ९५.४६ टक्‍के

जिल्ह्यात पहिला रुग्‍ण लासलगाव येथे आढळला होता. त्‍यानंतर ४ जुलैला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर पोचली होती. पहिला रुग्‍ण आढळल्‍यापासून तब्बल ११४ दिवसांनी, २१ जुलैला जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या दहा हजारांहून अधिक झाली होती. त्यानंतर रुग्‍णसंख्या २० हजार होण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला, तर त्यापुढील दहा हजार रुग्ण १३ दिवसांत वाढून २३ ऑगस्‍टला रुग्णसंख्या ३० हजार झाली होती. पुढे ११ दिवसांनी म्हणजे ३ सप्टेंबरला रुग्णसंख्येने चाळीस हजारांचा टप्पा ओलांडला, तर अवघ्या आठच दिवसांत दहा हजार रुग्ण वाढून एकूण रुग्णसंख्या ५० हजारांपुढे गेली होती.

रुग्णसंख्या एक लाखापुढे

या टप्प्यात रुग्णवाढीची गती वाढलेली असल्याने त्यापुढील दहा हजारांचे दोन टप्पे गाठायलाही सातच दिवसांचा कालावधी लागला अन्‌ रुग्णसंख्या थेट सत्तर हजारांवर पोचली. १८ सप्‍टेंबरला साठ हजार, तर २५ सप्‍टेंबरला रूरुग्‍ण संख्येने सत्तर हजारांचा टप्पा ओलांडला. पुढील नऊ दिवसांनी म्हणजे ४ ऑक्‍टोबरला आणखी दहा हजार रुग्‍ण वाढल्‍याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ऐंशी हजारांपेक्षा जास्त झाली होती. तर नव्वद हजारांहून अधिक रुग्‍ण होण्यासाठी १६ दिवसांचा कालावधी लागला. गेल्‍या २० ऑक्‍टोबरला बाधितांची संख्या ९० हजार झाल्यानंतर मात्र रुग्णवाढीचा वेग मंदावला व तब्बल ३८ दिवसांनी रुग्णसंख्या एक लाखावर पोचली.

डबलिंग रेट ७७ दिवसांवर

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्‍ण आढळत असताना सप्‍टेंबरच्‍या दरम्‍यान रुग्‍णसंख्या दुपटीचा दर (डबलिंग रेट) साधारणतः १६ ते १८ दिवसांचा होता. रुग्‍णसंख्या पंचवीस हजारांहून ५० हजार होण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागला. गेल्‍या ११ सप्‍टेंबरला ५० हजार रुग्‍णसंख्या झाली होती. तेथून एक लाख कोरोनाबाधित होण्यासाठी ७७ दिवसांचा कालावधी लागला असून, सध्या रुग्‍ण दुपटीचा दर ७७ दिवसांचा झाला आहे.

महिनानिहाय स्थिती
महिना स्‍वॅब चाचण्या कोरोनाबाधित कोरोनामुक्त मृत्‍यू

३० जूनपर्यंत २१,६४६ ४,११४ २,३४० २३८
जुलै ३२,९०४ १०,३०२ ८,७८७ २६१
ऑगस्‍ट ७६,३१० २२,९७० १८,२९४ ३७३
सप्‍टेंबर १,३६,५८० ३८,४९० ३६,९७० ४९८
ऑक्‍टोबर ६५,६५० १७,७९५ २१,६१५ ३००
२७ नोव्‍हेंबरपर्यंत ४३,९६६ ६,५०१ ७,६२० ११२

जिल्ह्यात आढळलेले वयोगटनिहाय बाधितांचे प्रमाण

वय (वर्षांमध्ये) पुरुष महिला एकूण
० ते १२ ३,१४१ २,३६७ ५,५०८
१३ ते २५ ८,८८१ ५,९६९ १४,८५०
२६ ते ४० २१,८३८ ११,५०६ ३३,३४४
४१ ते ६० २१,३३३ ११,७५४ ३३,०८७
६१ वर्षांपुढील ८३१६ ५०६७ १३,३८३
एकूण ६३,५०९ ३६,६६३ १००१७२

तालुकानिहाय स्‍थिती अशी
तालुका कोरोना पॉझिटिव्‍ह बरे झालेले रुग्‍ण मृत्‍यू उपचार घेत असलेले रुग्‍ण

नाशिक ४,७५१ ४,५७१ ८४ ९६
निफाड ४,९०७ ४,५११ १०६ २९०
सिन्नर ५,०५९ ४,६७२ ८५ ३०२
बागलाण १,५४७ १,४३६ ४६ ६५
चांदवड १,२९४ १,१८९ २२ ८३
देवळा ९१२ ८५० २१ ४१
दिंडोरी १,४५५ १,३४७ ४१ ६७
इगतपुरी २,१३४ २,०६१ ४७ २६
कळवण ५९६ ५६६ १३ १७
मालेगाव १९०९ १८१९ ६१ २९
नांदगाव २३२० २१७० ६६ ८४
पेठ ११० १०६ ४ ०
सुरगाणा १५३ १५० २ १
त्र्यंबकेश्र्वर ७३७ ६९४ १३ ३०
येवला १०२६ ९५७ ५५ १४

महापालिका हद्दीतील स्‍थिती

नाशिक महापालिका ६६,१३० ६३७४३ ९०२ १४८५
मालेगाव महापालिका ४३०७ ४०२८ १७१ १०८
जिल्‍हाबाह्य ८२५ ७५६ ४३ २६

जिल्ह्यातील स्‍थिती

स्‍वॅब अहवाल चाचण्या ३,७७,०५६
कोरोना पॉझिटिव्‍ह १,००,१७२
निगेटिव्‍ह अहवाल २,७५,५०७
प्रलंबित अहवाल १३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com