क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eSakal (24).jpg

"ज्या वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले. त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. मलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाऊ शकलो नाही."

क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

वडिलां चे अंत्यदर्शन घेतले मुलाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे   (Word Count

सिडको (नाशिक) : कोरोनाबाधित मुलाने कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतले. ही हृदयद्रावक घटना सिडकोत घडली. हे दृश्‍य बघणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले. 

बापाचे अंत्यसंस्कारही नाही नशिबी
सिडकोतील राजेंद्र सूर्यवंशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. त्यातच जळगावला राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळेच निधन झाल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. त्यांना गावी जाणेही कठीण होते. मात्र, वडिलांच्या अंत्यविधीला आपण जाऊ शकत नाही, याची खंत त्यांच्या मनात सलत होती. अखेर त्यांच्या आप्तस्वकीयांनी वडिलांचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करून देत त्यांची इच्छा पूर्ण केली. वडील व मुलाचे हे दृश्य बघणाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप


ज्या वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले. त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. मलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाऊ शकलो नाही. कोरोनाचे संकट काय आहे, हे ज्याला कोरोना झालेला असतो, त्यांना ते फार जवळून बघायला मिळते. अशी वेळ कोणावरही येऊ नये. सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. -राजेंद्र सूर्यवंशी, मुलगा, उत्तमनगर, सिडको 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार 

Web Title: Corona Infected Son Watch Father Funeral Video Conferencing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonNashik
go to top