मालेगाव कोरोनामुक्तीचा 'हा' गुणकारी उपाय?...पोलिसांचा आगळावेगळा प्रयोग

malegaon 1234.jpg
malegaon 1234.jpg
Updated on

नाशिक : (मालेगाव) कोरोनातून संपुर्ण मुक्तीसाठी मालेगाव पोलिसांनी आता एक वेगळा प्रयोग करायचे ठरवले आहे. त्यांनी चक्क उर्दू भाषेत सोप्या सूचना असलेले पत्रक तयार केले आहे. शुक्रवार (ता. 5) पासून त्याचे घरोघर वितरण होईल. हा प्रयोग म्हणजे मालेगाव कोरोनामुक्त करण्याचा गुणकारी उपाय ठरणार...असा प्रशासनाचा विश्वास आहे.

घराघरांमध्ये वितरण करण्यात येणार

श्री.कडासने म्हणाले, कोरोना विषाणूबद्दल सर्व समाजांमध्ये जनजागृती होऊन कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. महानगरपालिकेमार्फत मराठी व ऊर्दू भाषेत ही माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. आजपासून शहरातील पुर्व भागातील अक्सा कॉलनी, रमजानपुरा भागातील प्रत्येक घराघरांमध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे, तर पश्चिम भागातील संगमेश्वर, कॅम्प परिसरामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरातील प्रभावीत भागांमध्ये कॉर्नर बैठका घेवून जनजागृती करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

कोरोनावर मिळविणार विजय

कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करतांना प्रभावीत झालेल्या नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल अजुनही मोठ्या प्रमाणात समज गैरसमज आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकामागे एक संकटांचा सामना करतांना नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये कोरोना जनजागृती आवश्यक असल्याचे लाचलुचपत विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयक सुनिल कडासने यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे. उर्दू भाषेवर प्रभूत्व असलेल्या कडासने यांनी त्यासाठी मालेगावच्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द आणि संदर्भाचा उपयोग करुन एक उर्दू पत्रक तयार केला आहे. त्याचे आजपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या भागात घरोघर वितरण होईल. प्रत्येक नागरीकाशी संवाद साधला जाईल. त्यामुळे कोरोनावर यश मिळेल असा त्यांचा दावा आहे. 

सुचनांचे काटेकोर पालन करा

सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदि लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करुन योग्य उपचार वेळेवर करुन घ्यावा. वयोवृध्दांसह दीर्घ आजार असणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना विषाणू घातक ठरत आहे. शहरामध्ये क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या आजाराने पिडीत रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. नागरिकांनी नियमीतपणे मास्क वापरणे आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे, आरोग्य प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती पत्रक वितरणाच्या कार्यक्रमात लाचलुचपत विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयक श्री.कडासने बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, सामान्य रुग्णालयाचे डॉ.हितेश महाले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.अझहर, सेवाभावी संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकरर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com