"पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 3 June 2020

"मला कोरोना झाला आहे. तू मला दोन हजार रूपये दे.. नाहीतर तुझ्या अंगावर थुंकून तुला करोना आजार लावेन. पैसे न दिल्यास हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी त्याने दिली..अन् समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय घडले नेमके..वाचा?

नाशिक : "मला कोरोना झाला आहे. तू मला दोन हजार रूपये दे.. नाहीतर तुझ्या अंगावर थुंकून तुला करोना आजार लावेन. पैसे न दिल्यास हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी त्याने दिली..अन् समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय घडले नेमके..वाचा?

असा घडला प्रकार

पोलिसांच्या माहितीनुसार, तुफैस शेख हे बेला पेट्रोलपंपावर कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी (दि.१) ते पेट्रोलपंपावर असताना संशयित नाडे त्यांच्याजवळ आला. "मी मालेगावी जावून आलो आहे. मला कोरोना झाला आहे. तू मला २ हजार रूपये दे नाहीतर तुझ्या अंगावर थुंकून तुला कोरोना आजार लावेन. पैसे न दिल्यास हातपाय तोडून टाकेन," अशी धमकी नाडे याने शेख यांना दिली. याप्रकरणी शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात नाडेविरुद्ध तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी नाडे यास मंगळवारी (ता.३) अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

गुन्हा दाखल

या प्रकरणी तुफैस अहमद शबीर शेख (४५, रा.जोगावाडा, भद्रकाली) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली.
दीपक सोपान नाडे (३२, रा. नागसेननगर, वडाळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatening to spit on the body nashik marathi news

Tags
टॉपिकस