esakal | मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच
sakal

बोलून बातमी शोधा

ramu borse.jpg

(साकोरा) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिकहून आई-वडिलांना शेतीकामासाठी मदत करण्यासाठी घरी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. रामू रवींद्र बोरसे असे मृताचे नाव आहे. ही घटना वाघदरा शिवारात रविवारी (ता.12) सायंकाळी घडली. 

मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (साकोरा) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिकहून आई-वडिलांना शेतीकामासाठी मदत करण्यासाठी घरी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. रामू रवींद्र बोरसे असे मृताचे नाव आहे. ही घटना वाघदरा शिवारात रविवारी (ता.12) सायंकाळी घडली. 

अशी आहे घटना

रामू बोरसे (वय 22) नाशिकला बीसीएस कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे तो आपल्या घरी आला होता. वाघदरा शिवारात आई-वडिलांना तो शेतीत मदत करीत होता. रविवारी कांदा पिकाला पाणी भरणे सुरू होते. त्याचा विजेच्या तारेवर पाय पडल्याने त्याला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी त्याला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच शोककळा पसरली. शेतीव्यवसाय करून मुलाला उच्चशिक्षित करण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिल्याने बोरसे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.  

हेही वाचा > धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...

हेही वाचा >  BREAKING : मालेगावची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष IAS अधिकाऱ्यांची नेमणूक..'हे' अधिकारी सांभाळणार जबाबदारी