काय सांगता...कोरोनाबाधित रुग्ण पाचव्या दिवशीच जाणार घरी?...पण

game.jpg
game.jpg

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्णांच्या परीक्षणानंतर कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याने कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना पाचव्या दिवशीच घरी पाठविले जात आहे. त्यांना घरातच विलगीकरणाची परवानगी दिली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नवीन नियमावली जाहीर 

मेअखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनारुग्णांची संख्या 318 वर पोचल्याने वाढत्या आकडेवारीसंदर्भात आयुक्त गमे यांनी स्पष्टीकरण दिले. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे व मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. सरकारने कोरोनासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली असून, त्यात कमी लक्षणे असलेल्या रुग्णांचा उपचाराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर स्वॅब घेतला जात नाही. कोरोनाची तीव्रता पाच ते दहा दिवसांची असल्याने त्यानंतर या रुग्णांच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही. शहरात "लो रिस्क'मधील रुग्णांची संख्या वाढत आहे. "हाय रिस्क' रुग्णांचे गुगल ट्रॅकिंग केले जात असल्याने आकडेवारी वाढताना दिसत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनाची लक्षणे कमी आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात सध्या 198 रुग्ण उपचार घेत असून, त्यातील फक्त तीन रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तर 16 रुग्णांना ऑक्‍सिजनची मदत दिली जात आहे. 179 रुग्णांमध्ये कमी लक्षणे असल्याने त्यांच्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात सीसीटीव्ही 

सध्या शहरात दोनशे रुग्ण उपचार घेत असले तरी त्यातील अवघ्या 19 रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्र लक्षणे आढळत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ज्या रुग्णांकडून सामूहिक शौचालयाचा वापर केला जातो, अशा रुग्णांची यादी करून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविले जात नाही. दाट लोकवस्तीच्या भागात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था महापालिकेकडून केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अनेक प्रयत्न करूनही नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने पोलिसांच्या मदतीसाठी अशा भागांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com