नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांवर; जिल्‍ह्यात आज १ हजार ५७ बाधित

अरुण मलाणी
Monday, 28 September 2020

सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ७ हजार ५७१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३ हजार ३३६ नाशिक शहरातील असून, ३ हजार ६३३ नाशिक ग्रामीणचे तर ४७५ मालेगाव आणि ९७ जिल्‍हाबाह्य कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

नाशिक:  जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, यात नाशिक शहरातून सर्वाधिक रूग्‍ण आढळून येत आहेत. शहरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या एकूण संख्येने सोमवारी (ता.२८) पन्नास हजारांचा आकडा ओलांडला. जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या एकूण ७३ हजार ८८८ बाधितांपैकी नाशिक शहरातील ५० हजार १८६ बाधित नाशिक शहरातील आहेत. आतापर्यंत बरे झालेल्‍या ६४ हजार ९८१ रूग्‍णांपैकी नाशिक शहरातील ४६ हजार ०९४ बाधित आहेत. दरम्‍यान दिवसभरात १ हजार ०५७ कोरोना बाधित आढळून आले. ५०१ रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, २२ रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. 

३ हजार ३३६ रुग्ण नाशिक शहरातील

सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ७ हजार ५७१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३ हजार ३३६ नाशिक शहरातील असून, ३ हजार ६३३ नाशिक ग्रामीणचे तर ४७५ मालेगाव आणि ९७ जिल्‍हाबाह्य कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्‍यान सोमवारी दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ६८२, नाशिक ग्रामीणचे ३४२, मालेगावचे २७ तर जिल्‍हाबाह्य सहा बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांध्ये नाशिक शहरातील ३४५, नाशिक ग्रामीणचे १२१, मालेगावचे ३१ तर जिल्‍हाबाह्य चार रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. दिवसभरात झालेल्‍या २२ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील दहा, नाशिक ग्रामीणच्‍या बारा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ९६०, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १८०, मालेगाव महापालिका रूग्‍णालये १३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २० तर जिल्‍हा रूग्‍णालयात चार संशयित दाखल झालेले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ९४६ अहवाल प्रलंबित असून, यापैकी नाशिक शहरातील १ हजार ३९७ अहवालांचा समावेश आहे. 
 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

संशयितांचा दैनंदिन आलेख वाढताच... 

२० सप्‍टेंबर---------२१०४ 
२१ सप्‍टेंबर---------१८८६ 
२२ सप्‍टेंबर----------२१२४ 
२३ सप्‍टेंबर----------१८०७ 
२४ सप्‍टेंबर----------१६७१ 
२५ सप्‍टेंबर-----------२६९२ 
२६ सप्‍टेंबर-----------२४०३ 
२७ सप्‍टेंबर-----------१८१७ 
२८ सप्‍टेंबर------------२१७७ 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in nashik city over 50 thousand nashik marathi news