Corona Update : जिल्‍ह्यात एकूण बाधितांची संख्या ८० हजार पार; डबलिंग रेट ३१ दिवसांचा

corona positive patient count crosses 80 thousand mark nashik marathi news
corona positive patient count crosses 80 thousand mark nashik marathi news

नाशिक : जिल्‍ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ८० हजार पार पोहाचला आहे. रविवारी (ता.४) नव्‍याने आढळलेल्‍या ८३६ बाधितांमुळे जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या ८० हजार ११६ झाली आहे. यापैकी ६९ हजार १७१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. पहिल्‍या टप्‍यात जिल्‍ह्‍यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असतांना रूग्‍ण दुप्पटीचा दर अर्थात डबलिंग रेट सोळा ते अठरा दिवसांचा होता. नंतर हा पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांवर गेला होता. चाळीस हजारांहून ऐंशी हजार बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (डबलींग रेट) ३१ दिवसांचा राहिला आहे. 

म्‍हणून डबलिंग रेटचा कालावधीत वाढ

गेल्‍या ३ सप्‍टेंबरला जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांची संख्या ४० हजारांवर पोहोचली होती. मात्र सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या उत्तरार्धात बाधितांची संख्या घटली होती. तीन ते चार दिवस रूग्‍ण संख्या एक हजाराहून कमी राहिली होती. याचा परीणाम म्‍हणून डबलिंग रेटचा कालावधीत वाढ झाली आहे. दरम्‍यान रविवारी आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३९७, नाशिक ग्रामीणचे ४२७, मालेगावचे ३ तर जिल्‍हाबाह्य नऊ बाधितांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये ४७९ रूग्‍ण नाशिक शहरातील, २६७ नाशिक ग्रामीणचे, १ मालेगावचा तर जिल्‍हाबाह्य पंधरा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दहा रूग्‍णांचा दिवसभरात मृत्‍यू झाला असून, यापैकी पाच नाशिक शहरातील, नाशिक ग्रामीणचे चार तर मालेगाव महापालिका हद्दीतील एक रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. यातून एकूण मृतांचा आकडा १ हजार ४३७ वर पोहोचला आहे. 

दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार २६६, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ११६, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २१, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ९, जिल्‍हा रूग्‍णालयात पंधरा संशयित दाखल झाले आहेत. 

जिल्‍ह्‍यात रूग्‍ण वाढीचे महत्त्वाचे टप्पे व दिनांक  

४ जुलै------------------५ हजार 
२१ जुलै----------------१० हजार 
१० ऑगस्‍ट-------------२० हजार 
३ सप्‍टेंबर--------------४० हजार 
४ ऑक्‍टोबर------------८० हजार 
 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com