esakal | नाशिक जिल्ह्याला कोरोनाचा विळखा! सटाणात कोरोनाचा शिरकाव.. ३ कि.मी परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर.
sakal

बोलून बातमी शोधा

corona covid19.jpg

नाशिक जिल्ह्यात आज (ता.५) सकाळी आणखी ०५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये सटाणा शहरातील फुलेनगर (भाक्षी) येथील रहिवासी असलेले व सध्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याचा समावेश आहे. तसेच सटाणा शहराचा तीन किलोमीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर.उपविभागीय अधिकारी विजय भांगरे यांनी आदेश दिले आहेत.

नाशिक जिल्ह्याला कोरोनाचा विळखा! सटाणात कोरोनाचा शिरकाव.. ३ कि.मी परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे मालेगावात असून इतर तालुक्यात सुध्दा आता कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळत आहेत. नाशिक जिल्ह्यात आज (ता.५) सकाळी आणखी ०५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये सटाणा शहरातील फुलेनगर (भाक्षी) येथील रहिवासी असलेले व सध्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याचा समावेश आहे. तसेच सटाणा शहराचा तीन किलोमीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर.उपविभागीय अधिकारी विजय भांगरे यांनी आदेश दिले आहेत.

नाशिक शहरातील २० वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू

अन्य रुग्णांमध्ये येवला येथील एक परिचारिका, मालेगाव येथील नयापूरा भागातील सत्तर वर्षीय महिला तसेच नाशिक (बजरंगवाडी) येथील २० वर्षीय गर्भवती महिला आणि सिन्नर येथील रुग्णांचा समावेश असून त्यापैकी नाशिक येथील २० वर्षीय गर्भवती महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

मंगळवारी (ता.५) सकाळी प्राप्त झालेल्या ८० अहवालांपैकी ७५ अहवाल निगेटिव्ह तर ०५ अहवाल पॉझिटिव्ह...
▪मालेगाव एकूण रुग्ण संख्या ३४३.
▪नाशिक जिल्हा : ३८३

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

go to top