पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

शिरसाठ यांचे मुसळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरं एक शेत असून, तेथे त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी अकराला हृषीकेश नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र अकरानंतर तो दिसला नाही म्हणून त्याच्या चुलत भावाने पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत फटीतून पाहिले असता...

नाशिक / सिन्नर : शिरसाठ यांचे मुसळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरं एक शेत असून, तेथे त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी अकराला हृषीकेश नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र अकरानंतर तो दिसला नाही म्हणून त्याच्या चुलत भावाने पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत फटीतून पाहिले असता त्याला धक्काच बसला..

अशी घडली घटना

सिन्नर तालुक्‍यातील मुसळगाव येथील युवकाने आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत रविवारी (ता. 3) दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केली. हृषीकेश बाबासाहेब शिरसाठ (वय 21) असे युवकाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शिरसाठ यांचे मुसळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरं एक शेत असून, तेथे त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी अकराला हृषीकेश नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र अकरानंतर तो दिसला नाही म्हणून त्याच्या चुलत भावाने पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत फटीतून पाहिले असता त्याला हृषीकेशने पत्र्याच्या लोखंडी नळीला गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तातडीने पोलिस पाटलाला फोन करून सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हृषीकेशच्या घरची परिस्थिती चांगली होती. मोठ्या भावाचे नुकतेच लग्न ठरले असून, भाऊ व आईसोबत तो राहात होता. त्याच्या अचानक आत्महत्येचा शोध पोलिस घेत आहेत.  

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide in Musalgaon nashik marathi news