esakal | कोरोनाचा कहर काही थांबेना...जिल्ह्याचा आकडा @671
sakal

बोलून बातमी शोधा

corona pic.jpg

रविवारी (ता. 10) दिवसभरात कोरोनाग्रस्तांमध्ये नव्याने 39 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्याचा आकडा 671 झाला आहे. नाशिक शहरातील आत्तापर्यंत तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये आणखी सात जणांची भर पडली आहे. यात अंबडच्या संजीवनगरमधील एकाच कुटूंबातील 5, नाशिकरोडचा फळविक्रेता आणि जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरचा समावेश आहे. याच सातही जणांचे तिसरा रिपार्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 11) आणखी 30 ते 35 जण कोरोनामुक्त होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही मालेगावात बंदोबस्त करताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. यामुळे पोलिस दलाला मोठा दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाचा कहर काही थांबेना...जिल्ह्याचा आकडा @671

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कोरोना विषाणूला अटकाव होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मालेगावात कोरोनामुळे आठ बाधितांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा 28 झाला आहे. तर, नाशिक शहरातील कोरोनाबाधित सात रुग्ण कोरोनापासून मुक्त झाल्याने घरी गेले. सोमवारी (ता. 11) यात आणखी 30 ते 35 रुग्णांची भर पडणार असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

कोरोनामुळे मृत्युचा आकडा आठने वाढला  : दिवसभरात 38 पॉझिटिव्ह 

दरम्यान, रविवारी (ता. 10) दिवसभरात कोरोनाग्रस्तांमध्ये नव्याने 39 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्याचा आकडा 671 झाला आहे. तर, कोरोना विषाणूने सटाण्यापाठोपाठ ताहाराबादमध्ये शिरकाव केला असून निफाड-येवल्यात रुग्णांचा वाढता आकडा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतो आहे. 
नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळून आल्यानंतर, सातत्याने यात वाढ होते आहे. गेल्या बारा दिवसात तर कोरोनाग्रस्तांचा आकडा तीव्रतेने वाढला आणि सहाशेपार पोहोचला आहे. रविवारी (ता. 10) यात आणखी 39 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. यामध्ये नाशिक शहरात दोन, मालेगावात 20 आणि उर्वरित जिल्ह्यात 17 रुग्ण वाढले आहेत. यामध्ये येवला, इंदोरे (ता. दिंडोरी), मनमाड आणि ताहाराबाद येथील रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा 671 झाला असून, यात मालेगावातील 534 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर, सटाण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता ताहाराबादमध्येही कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने बागलाणवासियांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच, निफाड (5), येवल्यात (6) रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. 

मालेगावात मृतांचा आकडा वाढला 
शनिवारपर्यंत (ता. 9) मालेगावात 18 आणि नाशिक शहरात दोन असे 20 कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला होता. यामध्ये मालेगावातील आणखी आठ कोरोनाग्रस्तांच्या मृत्युची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 28 झाला आहे. यामध्ये मालेगावात बंदोबस्त करीत असताना कोरोनाची लागण झालेल्या नाशिक ग्रामीणच्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 

हेही वाचा > मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

नाशिकमधील सात रुग्ण मुक्त 
नाशिक शहरातील आत्तापर्यंत तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये आणखी सात जणांची भर पडली आहे. यात अंबडच्या संजीवनगरमधील एकाच कुटूंबातील 5, नाशिकरोडचा फळविक्रेता आणि जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरचा समावेश आहे. याच सातही जणांचे तिसरा रिपार्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 11) आणखी 30 ते 35 जण कोरोनामुक्त होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही मालेगावात बंदोबस्त करताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. यामुळे पोलिस दलाला मोठा दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

* एकूण कोरोना बाधित: 671 
मालेगाव : 534 
नाशिक : 39 
उर्वरित जिल्हा : 79 
परजिल्हा : 19 
* जिल्ह्यात एकूण मयत: 28 
* कोरोनमुक्त : 63