दुर्दैवी! 'त्या' जोडप्याने शेवटच्या क्षणीही सोडली नाही साथ; कारण ऐकून गावात खळबळ

couple died together.jpg
couple died together.jpg
Updated on

नाशिक / लखमापूर : विवाहित जोडपे..पण कोण जाणे काय झाले..त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे मृतदेह अचानक विहीरीत सापडले. त्यानंतर गावात खळबळ माजली. जीवनयात्रा संपविलेल्या या जोडप्याचे कारण तरी काय? अशी गावात चर्चा सुरू आहे.

अशी घडली घटना

दिंडोरीतील उमराळे रोडवर मुरकुटे यांच्या विहिरीत दोन मृतदेह पडले असल्याचे शुक्रवारी (ता. २१) सकाळी लक्षात आले. पोलिसांच्या मदतीने ते मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर ओळख पटवली असता, ते इंदिरानगर येथील दत्तू उखा पवार (वय ४६) व संगीता दत्तू पवार (वय ३६) यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हाड तपास करत आहेत. घरगुती वादातून दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

मृत्यूचे नेमके कारण काय?

इंदिरानगर, दिंडोरी येथील दांपत्याचे मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून, मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com