शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संदाप मोगल
Friday, 21 August 2020

यंदा बारावीत रितेशने प्रवेश घेतला होता. शिवप्रेमी म्हणून त्याची खास ओळख होती. गणेशोत्सवकाळात जानोरी येथे जिवंत देखावे दाखविले जातात, त्यात रितेश नेहमी शिवराय, संभाजीराजे व मावळ्यांची भूमिका करत असे. पण त्याच्या अशा बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक / लखमापूर : यंदा बारावीत रितेशने प्रवेश घेतला होता. शिवप्रेमी म्हणून त्याची खास ओळख होती. गणेशोत्सवकाळात जानोरी येथे जिवंत देखावे दाखविले जातात, त्यात रितेश नेहमी शिवराय, संभाजीराजे व मावळ्यांची भूमिका करत असे. पण त्याच्या अशा बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काय घडले नेमके?

जानोरी येथील रितेश समाधान पाटील (वय १८) या शिवप्रेमी रितेश व त्याचे पाच मित्र किल्ला बघण्यासाठी गेले होते. गडावर चढताना इतिहासाच्या पाऊलखुणा बघत त्या आपल्या मोबाईलमध्ये टिपत ते सगळे ऐतिहासिक तळ्याजवळ गेले. तेथे तळ्याच्या काठावर सेल्फी घेण्याच्या व छायाचित्र काढण्याच्या नादात रितेशचा पाय घसरल्याने तो तळ्यात पडला. तळ्यात पाणी कमी असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

शिवप्रेमी म्हणून त्याची खास ओळख

रितेश युवकाचा रामशेज किल्ल्यावर सेल्फी काढताना तळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. जानोरी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने यंदा बारावीत प्रवेश घेतला होता. शिवप्रेमी म्हणून त्याची खास ओळख होती. गणेशोत्सवकाळात जानोरी येथे जिवंत देखावे दाखविले जातात, त्यात रितेश नेहमी शिवराय, संभाजीराजे व मावळ्यांची भूमिका करत असे. त्यामुळे त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार समाधान पाटील यांचा तो पुत्र होय.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Death at Ramshej fort nashik marathi news