पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दीपक शिरसाठचा जामीन नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शिरसाठला  गेल्या ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.५) फेटाळला आहे. 

नाशिक : सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शिरसाठला  गेल्या ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.५) फेटाळला आहे. 

काय आहे प्रकरण

शिरसाठ याची व्हॉट्सअपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली, त्यानंतर महिलेच्या सांगण्यावरुन  दीपकने थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधीत क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व सुरक्षा संबंधीत गोपनीय माहिती सोशल मीडियावरुन महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने.दीपकला अटक करत रवाणगी कारागृहात केली होती. दरम्यान शिरसाठ याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

दिपक शिरसाठ याने हेरगीरी करत पाकिस्तानला पुरवलेली अत्यंत संवेदनशील  माहिती मिळवणे अतिशय अवघड आहे. तरी देखील ती माहिती मिळवून पाकिस्तानला पाठवली. त्यामुळे देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिल  दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दीपक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court refused bail application of hal employee deepak shirsath nashik marathi news