''कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण अधिक'' - जिल्हाधिकारी

mandhare.jpg
mandhare.jpg
Updated on

नाशिक : रुग्णसंख्या का वाढते हे खरे असले, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. ६२ लाखांच्या जिल्ह्यात ५२ व्हेंटिलेटर, ४०० ऑक्सिजनवर, तर अडीच हजार रुग्ण आहेत, रोज जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहे त्यातील ७० टक्के बरे होत आहेत. त्यामुळे आकडेवारीने घाबरून जाण्यापेक्षा आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. असा विश्‍वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला. 

बाधित रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण अधिक 

श्री. मांढरे म्हणाले, की नाशिकला मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक भागांपेक्षा नाशिकची स्थिती चांगली आहे. आकडेवारीचा अर्थ लावणे फार किचकट असते. टेस्टिंग वाढल्या, की रुग्ण वाढतात, या आकडेवारीपेक्षा जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याला महत्त्व दिले आहे. पॉझिटिव्ह शोधून प्रसार टाळण्यावर आपला भर आहे. पूर्वी प्रतिदिन ८५० टेस्टिंगचे अहवाल येत होते, आता अहवालांची संख्या एक हजार २५० पर्यंत वाढविली आहे. मालेगावातील रुग्ण बरे होण्याचा दर देशात सर्वाधिक ८१ टक्के आहे. नाशिकचा ७० टक्के आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण विचारात घेतले पाहिजे. 

नाशिकची कोरोनाबाधितांची वाढ भयचकित करणारी नाही

रोज जेव्हा नाशिकला ३०० रुग्ण येतात, त्यातील साधारण ७० टक्के त्याच दिवशी बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे जरी एक हजार रुग्ण येतील, त्याच दिवशी ७०० रुग्ण घरी गेलेले असतील. त्यामुळेच नाशिकची वाढ भयचकित करणारी नाही. मालेगाव, धारावीसह विविध भागांत असे दिसते, की काही दिवस रुग्णसंख्या वाढते. त्यानंतर ती स्थिरावते आणि मृत्यूही कमी होतात, हा सगळा ट्रेंड लक्षात न घेता आकडेवारीचा अर्थ लावू लागलो तर नागरिकांमध्ये उगाचच भीतीचे वातावरण निर्माण होईल, हे टाळले पाहिजे. 

प्रत्येकाला बेड कसा? 

महापालिका, जिल्हा ग्रामीण भाग असे सगळे मिळून एकत्रितपणे रुग्ण शोधतो आहे. अतिदक्षता विभाग, बेड, नवनवीन औषध वाढविण्यावर भर आहे. पॉझिटिव्ह सापडणाऱ्या प्रत्येकाला वाटते, की मला रुग्णालयाचा बेड मिळावा. असे कसे होऊ शकते? ज्या रुग्णांना गरज आहे, ज्यांच्यात तीव्र लक्षणे (सिम्प्टमॅटिक) दिसून येतात, अशा रुग्णांना बेड देण्याचा प्रयत्न असतो. शासनाने आता घरी सोय असलेल्यांनी घरीच उपचार घेतले पाहिजेत, असे निर्देश दिले आहेत, हेही जिल्हावासीयांनी लक्षात घ्यायला हवे. 

सकारात्मकता महत्त्वाची 

मालेगाव पॅटर्नविषयी लोक बोलतात, मात्र असे पॅटर्न वगैरे काही नसतात. त्या-त्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न असतात. एका शहराचे उपाय दुसऱ्या शहराला जसेच्या तसे कधीच लागू होत नाहीत. तेथील नागरिकांनी घरगुती उपाय केले. मनाची तयारी करून कोरोनावर मात करण्याचा निर्धार केला. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या आवाक्यात आली. हाच सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. सांख्यिकी आकडेवारीपेक्षा आपण सगळ्यांनी आपल्यातील सकारात्मतेची मोट बांधली पाहिजे. जगात सर्वाधिक साधनसामग्रीचे देशही हतबल आहेत. त्यामुळे नुसती साधनसामग्रीही उपयोगी ठरतेच, असे नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com