संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या ७३ जणांना ४७ हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

या कारवाईतूनच मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपूत यांच्या न्यायालयात २५ जणांना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांच्या न्यायालयात ३४ जणांना प्रत्येकी ७०० रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, संचारबंदी व मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या ७३ नागरिकांना न्यायालयाने ४७ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

शहरात विशेष मोहीम सुरू

२१ मार्चपासून जिल्हा, तसेच देशभरात लॉकडाउन आहे. मात्र, शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल केले आहे. साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हा व आरोग्य प्रशासनाने अनलॉकच्या काळात मास्क वापर बंधनकारक केला असून, गर्दी टाळून सामाजिक अंतर पाळण्याचे नियम केले आहेत. मात्र, संचारबंदीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहे. त्यानुसार, विनामास्क, विनाहेल्मेट फिरणाऱ्यांविरोधात पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधितांना न्यायालयासमोर उभे केले जात आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

या कारवाईतूनच मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपूत यांच्या न्यायालयात २५ जणांना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांच्या न्यायालयात ३४ जणांना प्रत्येकी ७०० रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तर मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १४ जणांना प्रत्येकी ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew violators 73 people fined Rs 47 thousand nashik marathi news