दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

दुपारची वेळ...रंगनाथ ठाकरे शेतात काम करत होते. मुसळधार पावसामुळे त्यांनी झाडाचा आधार घेतला. मात्र तिथेच घात झाला. एकीकडे मुसळधार पाऊस अन् दुसरीकडे सगळं काही शून्य झालं... 

नाशिक : (रेडगांव खुर्द) दुपारची वेळ...रंगनाथ ठाकरे शेतात काम करत होते. मुसळधार पावसामुळे त्यांनी झाडाचा आधार घेतला. मात्र तिथेच घात झाला. एकीकडे मुसळधार पाऊस अन् दुसरीकडे सगळं काही शून्य झालं... 

अशी आहे घटना

सोनीसांगवी (ता. चांदवड) येथील रंगनाथ कचरू ठाकरे (वय ५७) या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी घडली. गुरुवारी दुपारी चांदवड तालुक्यात अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या वेळी रंगनाथ ठाकरे आपल्या शेतात काम करीत होते. त्या वेळी ते झाडाच्या आडोशाला उभे असताना अंगावर वीज कोसळून ते जागीच गतप्राण झाले. शवविच्छेदनानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच साळसाणे येथेही एक तरुण झाडाखाली उभा असताना झाडावर वीज कोसळल्याने त्याच्या पायांना शॉक बसल्यासारखे झाल्याने पाय बधिर झाले. त्याला लासलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

हेही वाचा >  दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonisangvi farmer dies nashik marathi news