
नाशिक : राज्यात कोरोना आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या आजारासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर लवकरच सायबर क्राइम विभागातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (ता. 6) येथे दिली. मास्कसह अन्य प्रतिबंधात्मक वस्तूंची वाढीव मागणी लक्षात घेता, साठेबाजी करणाऱ्यांवर करडी नजर असल्याचेही त्यांनी सांगितले.
मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर करडी नजर
एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टोपे यांच्या हस्ते रोबोटिक्स लॉन्जचे उद्घाटन झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आजच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती त्यांना दिली आहे. मास्क, सॅनिटायझर व अन्य वस्तूंची मागणी वाढली असली, तरी एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विक्री होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. साठेबाजी करणाऱ्यांना समज देत, प्रसंगी कारवाई केली जाईल. नागरिकांनीही घाबरून जाण्याची गरज नाही. संशयित रुग्ण, वैद्यकीय यंत्रणेतील कर्मचारी यांना मास्कची आवश्यकता असते. सर्वसामान्यांना त्याची आवश्यकता नाही. नियमितपणे हात धुवत आरोग्य जपावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा > हृदयद्रावक! वडिलांचा अंत्यविधी आटपायच्या आतच 'ती' परीक्षा केंद्रावर!...डोळ्यांतील अश्रु थांबता थांबेना...
"संदर्भसेवा'च्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न
संदर्भसेवा रुग्णालयात रेडिएशन युनिट कार्यान्वित करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. तसेच, डायलिसिस विभाग पूर्ण क्षमतेने काम करण्यासह अन्य उणिवा दूर करत पूर्ण क्षमतेने रुग्णालय कार्यान्वित होईल, यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. प्रभावीपणे डायलिसिस सुविधा देण्यासह मूत्रपिंड प्रत्यारोपणही रुग्णालयात होऊ शकेल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.