esakal | VIDEO :...अन् 'त्याने' चक्क नेलकटरने नागाचे दातच काढले!
sakal

बोलून बातमी शोधा

cobra video viral.png

हा सगळा प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. आणि तो इतका व्हायरल झाला की अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. आणि शिवाजी साबळेवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली

VIDEO :...अन् 'त्याने' चक्क नेलकटरने नागाचे दातच काढले!

sakal_logo
By
माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निफाड येथून जवळच असलेल्या उगाव तालुका निफाड येथे एका व्यक्तीने नागाला पकडून त्याचे दात नेलकटरच्या साहाय्याने काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच वनविभागाने साबळे याला ताब्यात घेतले.

काय आहे व्हिडिओमध्ये...?

निफाड येथील उगाव तालुक्यात (ता.२) शिवाजी साबळे यांनी एका नागाला पकडले. त्यानंतर त्या नागाचे दात नेलकटरच्या साहाय्याने काढत त्याला दंशहिन बनवले तसेच त्याला चापट्या मारून खेळ केला. वरून जायबंदी केले. हा सगळा प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. आणि तो इतका व्हायरल झाला की अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. आणि शिवाजी साबळेवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर वनविभागाने याची दखल घेत साबळे याला ताब्यामध्ये घेतले आहे. तसेच त्याला कोर्टासमोर हजर केले आहे.

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

go to top