महापालिकेच्या दिव्यांखाली अंधार! आठ वर्षांपासून लावले खांब; दिवे मात्र गायब

विक्रांत मते
Saturday, 26 September 2020

महापालिकेतर्फे सध्या शहरातील ९० हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर स्मार्ट करण्याचे गोंडस नाव प्रकल्पाला दिले असले तरी शहराच्या एका कोपऱ्यात आठ वर्षांपासून उभे केलेल्या खांबांवर अद्याप दिवेच लागले नसल्याची बाब समोर आली आहे. 

नाशिक : महापालिकेतर्फे सध्या शहरातील ९० हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर स्मार्ट करण्याचे गोंडस नाव प्रकल्पाला दिले असले तरी शहराच्या एका कोपऱ्यात आठ वर्षांपासून उभे केलेल्या खांबांवर अद्याप दिवेच लागले नसल्याची बाब समोर आली आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

खांबांवर अद्याप दिवेच नाही

महापालिका हद्दीतील म्हसरूळ-वरवंडी रोडवर सीतासरोवर ते महावीर पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंत आठ वर्षांपूर्वी वाजतगाजत ९८ पथदीप बसविण्यात आले. ग्रामीण भाग असला तरी वर्दळ असल्याने व या भागात कायम अपघात होत असल्याने पथदीप बसविण्यात आले. परंतु जेव्हापासून पथदीप उभारले गेले तेव्हापासून खांबांवर दिवेच बसविले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील ९० हजार खांबांवरील सोडियम काढून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. गेल्या महिन्यात मे. टाटा कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. परंतु म्हसरूळ रस्त्यावरील खांबांवर आठ वर्षांपासून दिवेच नसल्याच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.  

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darkness under municipal lights, empty Pillars planted for eight years nashik marathi news