
नाशिकहून काम संपवून मजूर पिक-अपने घरी परतत होते. पण त्यावेळी असे काही भीषण घडले ज्यामुळे संपूर्ण परिसरच हादरला. एकत्रच ३५ हून अधिक मजूरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज अस्वस्थ करणारा होता. वाचा काय घडले...
भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार
नाशिक / वीरगाव : नाशिकहून काम संपवून मजूर पिक-अपने घरी परतत होते. पण त्यावेळी असे काही भीषण घडले ज्यामुळे संपूर्ण परिसरच हादरला. एकत्रच ३५ हून अधिक मजूरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज अस्वस्थ करणारा होता. वाचा काय घडले...
असा घडला प्रकार
विंचूर-प्रकाशा महामार्ग क्रमांक सातवरील वनोली (ता.बागलाण) जवळच नाशिकहून काम संपवून शिरवाडे (ता. साक्री) येथील मजूर पिक-अपने (एमएच १५ एफव्ही ४८३९) घरी परतत असताना वनोली (ता. बागलाण) जवळ त्यांची गाडी येताच म्हसोबा मंदिराजवळ खड्डे टाळण्याच्या नादात चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिक-अप समोरून येणाऱ्या ट्रकवर (टीएन ८८ वाय ८३९९) जोरदार आदळली. जोराच्या धडकेमुळे पिक-अपमध्ये बसलेले सुमारे ३५ हून अधिक प्रवासी गाडीतून बाहेर फेकले गेले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. कामराज रबा ठाकरे (वय ४२) असे जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले. ट्रक व पिक-अप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, ११ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता.२४) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल
घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अत्यवस्थ असलेल्या तीन जणांना नाशिकला, तर नऊ जणांना मालेगावला हलविण्यात आले. जखमींमध्ये चार महिला, चार पुरुष व चार लहान मुले सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप
अत्यवस्थ असलेल्यांमध्ये बाबूराव सोनवणे (वय ५५), महेंद्र देसाई (२७), बंडू सोनवणे (४०) यांना नाशिकला, तर सुरेश पवार (८), पूजा पवार (८), गणेश सोनवणे (४), गोरख सोनवणे (३५), सुनंदा सोनवणे (२८), अर्जुन सोनवणे (३०), गोविंदा सोनवणे (३०), लक्ष्मण सोनवणे (२८), जोशविन सोनवणे (१८) यांना मालेगावला हलविण्यात आले.
Web Title: Truck And Pick Accident Vanoli Nashik Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..