एमडीएस प्रवेशप्रक्रियेसाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत

notice exam.jpg
notice exam.jpg
Updated on

नाशिक : वैद्यकीयच्‍या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्‍यात आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता विद्यापीठाशी संलग्‍नित दंत महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थ्यांची नोंदणी व प्रवेश पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्‍यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. 

 अंतिम प्रवेशाची तारीख ३१ जुलै

यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे दंत महाविद्यालयांच्‍या अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक यांच्‍यासाठी सूचना जारी केलेली आहे. त्‍यानुसार पदव्‍युत्तर दंत अभ्यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम प्रवेशाची तारीख ३१ जुलै निश्‍चित केली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे बंधनकारक असून, मुदतीनंतर रिक्‍त जागेवर विद्यार्थी प्रवेशीत करता येणार नाहीत. या रिक्‍त जागा कायम रिक्‍त समजण्यात येतील, असे स्‍पष्‍ट केले आहे. शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाशी संलग्‍नित दंत पदव्‍युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांचे नोंदणी व पात्रता प्रस्‍ताव नमुन्यानुसार सादर करायचे आहे.

मुदतीनंतर रिक्‍त जागांवर कायम रिक्तचा शिक्का

विद्यार्थ्यांचे नोंदणी व प्रवेशपात्रतेचे प्रस्‍ताव योग्‍य कागदपत्रांसह परिपूर्ण स्‍वरूपात विद्यापीठास सादर करण्याची जबाबदारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक यांची असेल, असे स्‍पष्ट केले आहे. प्रवेशीत विद्यार्थ्यांची नोंदणी व प्रवेश पात्रता, विद्यापीठाकडे प्रस्‍ताव प्राप्त झाल्‍यापासून ४५ दिवसांच्‍या आत प्राप्त करणे आवश्‍यक असेल. विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रता प्रदान झाल्‍याशिवाय शोधप्रबंध शीर्षक, परीक्षा अर्ज सादर करता येणार नसल्‍याचेही परिपत्रकात नमूद केले आहे. 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com