ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

चेतन चौधरी
Monday, 12 October 2020

सासू-सुनेचे अनेक किस्से आपण ऐकले. पण भुसावळ मध्ये अशी एक घटना घडली आहे. ज्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. आणि गावात शोककळा पसरली आहे. या घटनेने गावात दिवसभर सासू-सुनेचे आपसातील प्रेमळ संबंध आणि दोघींच्या मृत्यूचीच चर्चा होती. काय घडले नेमके?

नाशिक / भुसावळ : सासू-सुनेचे अनेक किस्से आपण ऐकले. पण भुसावळ मध्ये अशी एक घटना घडली आहे. ज्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. आणि गावात शोककळा पसरली आहे. या घटनेने गावात दिवसभर सासू-सुनेचे आपसातील प्रेमळ संबंध आणि दोघींच्या मृत्यूचीच चर्चा होती. काय घडले नेमके?

सासू-सुनेचे आपसातील प्रेमळ संबंध आणि दोघींच्या एकत्र मृत्यूची चर्चा

येथील रंजनाबाई सुरेश मनोरे (वय ४८) यांना पोटात त्रास होत असल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शस्त्रक्रियेदरम्यान रंजनाबाईंचा मृत्यू झाला. याबाबत सायंकाळी त्यांच्या सासू मीराबाई गोविंदा मनोरे (वय ६५) यांना समजताच त्यांचीही प्रकृती अचानक बिघडली आणि सूनबाईचा विरह सहन न झाल्याने रविवारी (ता. ११) पहाटे तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी पुणे येथून सूनबाईचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे गावात आणल्यानंतर साडेअकराच्या सुमारास सासू-सुनेवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे साकेगावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात दिवसभर सासू-सुनेचे आपसातील प्रेमळ संबंध आणि दोघींच्या मृत्यूचीच चर्चा होती. 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

साकेगाव येथील घटना; एकाच दिवशी दोघींचे अंत्यसंस्कार

पोटाच्या त्रासामुळे शस्त्रक्रियेदरम्यान सूनबाईचा मृत्यू झाल्याचे समजताच सासूबाईंनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून त्यांचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना साकेगाव (ता. भुसावळ) येथे घडली. सासू-सुनेवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करावे लागल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of mother in law due to daughter in law death nashik marathi news