esakal | अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

money found.jpg

म्हणून त्यांनी गावात जाऊन माहिती दिली. मात्र सदर प्रकाराबद्दल गावकरी अनभिज्ञ दिसून आले. घडलेला प्रकार व ज्या व्यक्तीचे पैसे हरवले त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटसअॅपवर मेसेज टाकला.

अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

sakal_logo
By
प्रकाश बिरारी

नाशिक : (कंधाणे) येथील वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी यांनी वटार शिवारात रस्त्यावर सापडलेले पन्नास हजार रुपये सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचे होते त्याचा शोध घेऊन त्याला परत केले. त्यांच्या या प्रामाणिपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून त्यांच्या कार्याबद्दल गावाचा नावलौकिक वाढवला आहे. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

पंचक्रोशीत अबू आण्णा या टोपण नावाने परिचित असलेले अमृता बिरारी निताणे येथे नातेवाईकांकडे कामानिमित्त जात असतांना वटार शिवारात नदीपुलावर एक पिशवी दिसली. त्यांना पिशवीत पन्नास हजार रुपये आढळून आले. सध्या सुरू असलेल्या मका सोंगणी व कांदा लागवडीसाठी एखाद्या शेतकऱ्याची भांडवलाची किंवा शेतमाल विक्रीची रक्कम असावी. एवढी मोठी रक्कम हरवली म्हटल्यावर वटार गावात चर्चा झाली असेल, म्हणून त्यांनी गावात जाऊन माहिती दिली. मात्र सदर प्रकाराबद्दल गावकरी अनभिज्ञ दिसून आले. घडलेला प्रकार व ज्या व्यक्तीचे पैसे हरवले त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटसअॅपवर मेसेज टाकला. मेसेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चा झाली. वटार गावातील देविदास भुरमल या शेतकऱ्याने हातउसनवार आणलेली पन्नास हजार रुपये रक्कम असलेली पिशवी घरी जात असताना रस्त्यात पडली असे सांगितले. 

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा

गावात सपत्नीक सत्कार...

आण्णांना समजले असता सदर व्यक्तीने पिशवी, नोटा व पैसे कोठून आणले अशी सर्व हकीकत सांगितल्यानंतर व आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्याची सर्व रक्कम परत केली. आण्णांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बागलाण प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कंधाणे गावात येऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान