आणखी एक पोलीस कोरोनाचा बळी; नाशिक शहर पोलिस दलातील सातवा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नाशिक / देवळाली कॅम्प : कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या वाहनावर चालक असलेले हवालदार निवृत्ती भाऊ बांगारे (वय ५७) यांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरातील पोलिसांमधील हा सातवा मृत्यू

शहरातील पोलिसांमधील हा सातवा मृत्यू आहे. बांगारे हे दोन वर्षापासून देवळाली कॅम्प पोलिस स्थानकात कर्तव्यावर होते. स्थानिक पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार छातीत न्यूमोनिया अधिक प्रमाणात झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

चिंतेत भर

कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची लागण होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death pf police due to corona nashik marathi news