नदीवर घडलेला 'तो' प्रकार पाहून.. मासेमारी करणाऱ्या बांधवानी आरडाओरड केला..अन् मग..

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 एप्रिल 2020

गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. बंधाऱ्यात बारमाही मुबलक पाणी असते. या बंधाऱ्यात पिळकोस, बगडू, बेज, भादवण व भेंडी या परिसरातील आदिवासी बांधव मासेमारी करतात. गोड्या पाण्याचे मासे मिळत असल्याने बंधाऱ्यावर सतत मासे घेणाऱ्यांची वर्दळ असते. या बंधाऱ्यावर घडलेला प्रकार बघून रविवारी बंधाऱ्यावर शुकशुकाट होता.

नाशिक / कळवण : तालुक्‍यातील नवी बेज गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरुणाचा गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला. काळू हिरामण गांगुर्डे (वय 30) असे मृताचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह रविवारी (ता. 5) सकाळी दहाला पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

कळवण तालुक्‍यातील नवी बेज येथील घटना 
काळू गांगुर्डे बुधवारी (ता. 1) दुपारी तीनला नदीकडे आला असता, त्याचा पाय घसरला व तो बंधाऱ्यात खोल पाण्यात बुडाला. गिरणा नदीवरील हा ब्रिटिशकालीन बंधारा अतिशय खोल असून, तो पाण्यात पडल्याचे लक्षात येताच तेथील मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांनी आरडाओरड करत त्याठिकाणी धाव घेतली. तो पाण्यातून वर येत नसल्याचे वस्ती व गावात समजताच ग्रामस्थ व पट्टीचे पोहणारे आदिवासी युवक बंधाऱ्याकडे धावून आले. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शनिवारी (ता. 4) अंधार पडेपर्यंत पाण्यात त्याचा शोध घेतला. मात्र, अंधार पसल्याने शोधकार्य थांबले. रविवारी सकाळी दहाला पुन्हा पोहणाऱ्या तरुणांनी खोल पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक कोशारे तपास करीत आहेत. दरम्यान, काळू गांगुर्डे गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. तो शेतमजुरी करून कुटुंब सांभाळत होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ आहे. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

मासेमारीसाठी प्रसिद्ध बंधारा 
गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. बंधाऱ्यात बारमाही मुबलक पाणी असते. या बंधाऱ्यात पिळकोस, बगडू, बेज, भादवण व भेंडी या परिसरातील आदिवासी बांधव मासेमारी करतात. गोड्या पाण्याचे मासे मिळत असल्याने बंधाऱ्यावर सतत मासे घेणाऱ्यांची वर्दळ असते. या बंधाऱ्यात आदिवासी युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने रविवारी बंधाऱ्यावर शुकशुकाट होता.  

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a young man in the Girna river nashik marathi news