esakal | चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

ashoka comp.jpg

कामगारांना शेतात फांद्या वेचणे व काजूगर निवडणे, साफ करणे वा शेतीविषयक कामे दिली होती. २८ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास अंबादास तुटे (वय २९) याच्या बरोबरच्या इतर कामगारांनी चेष्टामस्करी करीत काँप्रेसरने गुदद्वारात हवा भरली.

चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

sakal_logo
By
कमलाकर अकोलकर

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : चेष्टामस्करीत गुदद्वारात हवा भरल्याने अत्यवस्थ झालेल्या २९ वर्षीय रोजंदारीवर असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अशोका इस्टेट डेव्हलपरच्या तळवाडे शिवारातील कृषी उद्योग कंपनी आवारात घडली. नऊ दिवसांनंतर या घटनेची माहिती बाहेर आली, हे विशेष. 

चेष्टामस्करीच्या प्रसंगात तरुणाचा मृत्यू 

ठाणपाडा (ता. त्र्यंबकेश्वर)लगतच्या तळवाडे शिवारात अशोका इस्टेट डेव्हलपर प्रा. लि. कंपनीचा कृषी उद्योग सुमारे दीडशे एकरावर विस्तारला गेला आहे. या ठिकाणी विविध फळझाडे व त्या फळांपासून पेय व खाद्य पाकिटे बनविली जातात. येथील काजू, डाळिंब, आंबे अशा प्रकारातील फळांपासून वेफर्स, चिवडा, जाम अशी उत्पादने बनवून विक्री केली जातात. येथील शेतात कामासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार कामास येतात. साधारण अडीचशे रुपये रोज, अशी मजुरी दिली जाते. देवडोंगरी पाड्यावरील सात-आठ जणांचा ग्रुप येथे सव्वा महिन्यापासून रोजंदारीवर कामास आला होता. या सर्व अकुशल कामगारांना शेतात फांद्या वेचणे व काजूगर निवडणे, साफ करणे वा शेतीविषयक कामे दिली होती. २८ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास अंबादास तुटे (वय २९) याच्या बरोबरच्या इतर कामगारांनी चेष्टामस्करी करीत काँप्रेसरने गुदद्वारात हवा भरली. युवकास त्रास होऊ लागल्यावर सुपरवायझर जाधव याने मोटारसायकलने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तपासणीनंतर त्यास तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

‘अशोका’च्या कृषी उद्योगातील घटनेची नऊ दिवसांनंतर चर्चा 

खासगी गाडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, सायंकाळी पाचला युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत झालेला कामगार कंपनीत त्याची आई वेणू लहू तुटे व भावासह दुपारपासून होता. व्यवस्थापक हिरे व त्यांचे सहकारी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनास माहिती दिली. मृताची बहीण तेथेच कामास आहे. याबाबत मृताचा भाऊ सुभाष तुटे याने पोलिसांत घटनेची माहिती दिली. मात्र, घटना घडून नऊ दिवस झाले तरी कुठेही वाच्यता व तपास झाला नसल्याची चर्चा कामगारवर्गात होती. 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा


सदर अपघात झालेला असून, पोलिस तपास सुरू आहे. व्यवस्थापन पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करीत आहे. -प्रशासन विभाग, अशोका ग्रुप