पर्यटनासाठी गेलेल्या तरुण मौलानाच्या नशिबी असे दुर्देव; गिरणा धरणावरील घटना

प्रमोद सावंत
Sunday, 4 October 2020

शुक्रवार सायंकाळची घटना...'फिरायला जातोय, रात्री उशीर होईल...मशिदीतच थांबेल' असं सांगून मोहम्मद घराबाहेर पडला तो आलाच नाही. दुसऱ्या दिवशी थेट त्याची डेड बॉडीच. कुटुंबियांचा जीवघेणा आक्रोश...वाचा काय घडले?

नाशिक : (मालेगाव) शुक्रवार सायंकाळची घटना...'फिरायला जातोय, रात्री उशीर होईल...मशिदीतच थांबेल' असं सांगून मोहम्मद घराबाहेर पडला तो आलाच नाही. दुसऱ्या दिवशी थेट त्याची डेड बॉडीच. कुटुंबियांचा जीवघेणा आक्रोश...वाचा काय घडले?

अशी आहे घटना

गिरणा धरणावर शुक्रवारी सुटीनिमित्त पर्यटनासाठी गेलेल्या येथील प्रार्थनास्थळात इमाम म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद फैजान मोनिस (वय २१) यांचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी हा प्रकार घडला. फैजान यांनी कुटुंबीयांना पर्यटनासाठी गिरणा धरणावर जात असून, रात्री मशिदीतच थांबेल, सकाळी घरी येईल, असे सांगितले. मात्र सकाळी त्यांचा मृतदेह पाहण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. धरण परिसरातील नागरिकांनी फैजान धरणातील पाण्यात बुडताच त्यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. सामाजिक कार्यकर्ते शफीक अहमद यांनी अग्निशामक दलाला ही माहिती कळवली. अग्निशामक दलाचे जवान शकील अहमद यांनी मध्यरात्री बारापर्यंत शोध घेऊनही त्यांचा मृतदेह मिळून आला नाही. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

तब्बल तीन तासानंतर शोध लागला 

आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी किल्ला हद्दीतील किल्ला तैराक ग्रुपच्या तरुणांना रात्रीच धरणावर पाठविले. या तरुणांनी तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर साडेतीनच्या सुमारास या इमामचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. शवचिकित्सेनंतर शनिवारी (ता.३) सकाळी त्यांचा दफनविधी पार पडला. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.  

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a young Maulana nashik marathi news